Join us

मुंबईतल्या दहा धोकादायक पुलांवर महापालिका फिरवणार हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 4:51 AM

अंधेरी येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने केलेल्या पाहणीत मुंबईतील दहा पूल धोकादायक असल्याचे दिसून आले.

मुंबई : अंधेरी येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने केलेल्या पाहणीत मुंबईतील दहा पूल धोकादायक असल्याचे दिसून आले. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हे दहा धोकादायक पूल जमीनदोस्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र हँकॉक पूल पाडून तीन वर्षे उलटली तरी अद्याप नव्याने बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे नियोजनानंतरच हे काम हाती घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेमार्गांवरील पुलांबरोबरच महापालिकेच्या पुलांचीही पाहणी करण्यात आली. त्यानुसार लोअर परळ येथील डिलाईल पूल बंद करण्यात आला. मात्र हा पूल बांधणार कोण? यावरून वाद सुरू आहे. मुंबईतील २९६ पुलांच्या संरचनात्मक पाहणी अहवालातून धोकादायक पुलांची माहिती उघड झाली होती.>हे पूल पाडणारगोरेगाव पूर्व - वालभाट नाल्यावरील पूल, मालाड - गांधी नगर, टेकडी कुरार व्हिलेजजवळील पूल, दहिसर - एसबीआय कॉलनीजवळील पूल, सांताक्रुझ - चेंबूर लिंक रोडवरील पूल, कांदिवली पूर्व - बिहारी टेकडीजवळील पूल, कांदिवली पश्चिम - इराणी वाडीजवळील पूल, कांदिवली - एस.व्ही.पी. रोड, कृष्णकुंज बिल्डिंगजवळील पूल, कांदिवली - आकुर्ली रोडवरील पूल, साकीनाका - हरी मस्जिद नाला, खैरानी रोडवरील पूल, घाटकोपर पश्चिम- एल.बी.एस. मार्ग, चिराग नगरचा पूल.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका