पार्किंगच्या निविदांची हॅट्ट्रिक
By admin | Published: June 26, 2015 01:44 AM2015-06-26T01:44:05+5:302015-06-26T01:44:05+5:30
दिवसेंदिवस पनवेल शहरातील पार्किंगची समस्या जटील होत आहे. शहरातील अरुंद रस्ते, जुन्या इमारतीत पार्किंगची सोय नसणे, त्यामुळे वाहने उभी करायची कुठे,
प्रशांत शेडगे, पनवेल
दिवसेंदिवस पनवेल शहरातील पार्किंगची समस्या जटील होत आहे. शहरातील अरुंद रस्ते, जुन्या इमारतीत पार्किंगची सोय नसणे, त्यामुळे वाहने उभी करायची कुठे, हा प्रश्न पनवेलकरांसमोर आहे. त्यातच वाहतुकीचा सर्व्हे करून पार्किंगबाबत निर्णय घेण्यासाठी वारंवार निविदा काढूनही एजन्सी मिळत नसल्याने शहरातील वाहतूक कोंडी वाढतच आहे.
शहरातील कापड बाजार, झवेरी बाजारात सतत वर्दळ असते. शहरात नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहप्रकल्पांमध्येपार्किंगची सुविधा देण्यात येत असली तरी आजही अनेक इमारती अशा आहेत, जिथे पार्किंगची व्यवस्था नाही. या इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर, खुल्या मैदानात आपली वाहने उभी करतात. तर इमारतींमध्ये जिन्याखालच्या जागेत वाहने उभी करण्याची वेळ रहिवाशांवर येते. परिणामी पार्किंगवरून सोसायट्यांमध्ये वाद होत असल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. वारंवार भेडसावणाऱ्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पनवेल शहरातील पार्किंग धोरण ठरवून उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र एजन्सीच मिळत नसल्याने हे कामही रखडले आहे.