मुंबई : ई वॉर्डमध्ये ७ जागांच्या लढतीत काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी २ जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे. ई वॉर्डमध्ये भाजपा, समाजवादी व अखिल भारतीय सेनेचा प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाला.२०७ प्रभागातून भाजपाच्या सुरेखा लोखंडे ६ हजार ५ मतांनी विजयी झाल्या. २०८ प्रभागातून शिवसेनेचे रमाकांत रहाटे तर २१० प्रभागातून शिवसेनेचे यशवंत जाधव विजयी झाले. २११ हा प्रभाग पूर्वी ‘डी’ विभागात होता, येथे शिवसेनेचा नगरसेवक होता. फेररचनेनंतर या प्रभागात समाजवादी पक्षाच्या रईस शेख यांचा ९ हजार ४५५ मतांनी विजय झाला. २०५ या प्रभागात दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी या हॅट्ट्रिक करत पुन्हा एकदा २१२ प्रभागातून विजयी झाल्या़ २१३मधून काँग्रेसच्या जावेद जुनेजा यांनी विजय मिळवत आपले नगरसेवकपद कायम राखले. २१० प्रभागातून काँग्रेसच्या उमेदवार सोनम जामसुतकर यांचा ९ हजार ९५८९ मतांनी विजय झाला़ याआधी हा प्रभाग ‘डी’ विभागात होता़ त्या जागेवर काँग्रेसचाच नगरसेवक असल्याने ही जागा अबाधित राहिली आहे. ई वॉर्डमधील २१३ या प्रभागात केवळ ४६ टक्के मतदान झाले़ येथे मुस्लीमबहुल समाजाचा मतदानासाठी निरुत्साह दिसून आला. एमआयएमने चुरशीची लढत दिली. (प्रतिनिधी)
ई वॉर्डमध्ये अभासेची हॅट्ट्रिक
By admin | Published: February 25, 2017 3:43 AM