ॲम्ब्युलन्ससाठी डेडिकेटेड लेन ठेवा; माजी आरोग्य मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना
By मनोहर कुंभेजकर | Published: January 25, 2023 06:57 PM2023-01-25T18:57:06+5:302023-01-25T18:57:21+5:30
अवजड वाहने आणि डंपर हे ट्राफीकचे नियम पाळत नाही, हायवेची परिस्थिती ट्राफीक मुळे इतकी वाईट आहे की, दहिसर चेकनाका व ते कासा येथून येणारे २-३ रूग्ण आठवड्यात दगावतात ही वस्तुंस्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-ॲम्ब्युलन्ससाठी डेडिकेटेड लेन व ग्रीन कॉरीडर असावा,डंपर व अवजड वाहनांना गव्हर्नर स्पीड लावाण्याची सक्ती करावी यासह अनेक सूचना राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.
डॉ. दीपक सावंत हे गेल्या शुक्रवारी दि,२० रोजी सकाळी पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जात असताना महामार्गावर काशिमीरा येथे त्यांच्या कारला डंपरने मागून जोरदार धडक दिली. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर अंधेरी पश्चिम
जुहू येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाता नंतर त्यांना आलेले अनुभव आणि सामान्य नागरिकांच्या व्यथा मांडून त्यांनी हॉस्पिटल मधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबत जातीने लक्ष घालण्याची त्यांनी विनंती केली आहे.
अवजड वाहने आणि डंपर हे ट्राफीकचे नियम पाळत नाही, हायवेची परिस्थिती ट्राफीक मुळे इतकी वाईट आहे की, दहिसर चेकनाका व ते कासा येथून येणारे २-३
रूग्ण आठवड्यात दगावतात ही वस्तुंस्थिती आहे. आपल्याला अपघात झाल्यावर वर्सोव्या वरून पोलीस ॲम्ब्युलन्स यायला वेळ लागला तर सामान्याचे काय?असा सवाल त्यांनी केला.
मेट्रोच्या कामामुळे जनता त्रस्त आहे रस्ते उखडले आहेत.तसेच मुंबईतील पश्चिम व पूर्व उपनगरातील मधील बेफाम कन्स्ट्रक्शन रोखा, मुंबईतील डंपर पहाटे २.३० पासून बेफाम रस्ता कापतात, सर्व सामान्याचा जीव पार्किंगच्या गाडया तुडवतात याकडे लक्ष देवून आपण रस्ते अपघाताची माहिती घ्यावी अशी सूचना त्यांनी केली आहे.