दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे कॅम्प ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:06 AM2021-04-04T04:06:32+5:302021-04-04T04:06:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी संबंधितांना हाजीअलीला जावे लागते. मात्र सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा आजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी संबंधितांना हाजीअलीला जावे लागते. मात्र सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा आजार पसरण्याचा धोका पाहता मुंबई तसेच उपनगरातील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे कॅम्प ठेवण्याची विनंती उच्च न्यायालयातील वकिलांनी केली आहे.
विरार ते चर्चगेट परिसरात राहणाऱ्या दिव्यांगांना हाजीअलीला बाह्यरुग्ण विभागात जावे लागते. मुख्य म्हणजे यासाठी त्यांना सोबत नातेवाइकांना न्यावे लागते. ज्यामुळे पैसे आणि वेळ फुकट जातोच; मात्र अशा कोरोनाची लागण होऊन एखाद्याच्या जीवावरही बेतू शकते. त्याच कारणास्तव जर मुंबई व उपनगरात असलेल्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा कॅम्प लावला तर त्यामुळे दिव्यांगांना फार मदत होईल, असे उच्च न्यायालयाचे वकील ॲड. ए. टी. सिद्दिकी यांनी सांगितले.