लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी परदेशात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे या प्रवर्गातील हुशार मुलांना परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत २० जून आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
कोणकोणता खर्च मिळतो?
विद्यापीठाची शैक्षणिक फी, आरोग्य विमा, व्हिसा शुल्क, वार्षिक निर्वाह भत्ता तसेच विमान भाडेही दिले जाते.
कोणाला मिळते ही शिष्यवृत्ती?
अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो.
२० जूनपर्यंत करा अर्ज
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० जूनपर्यंत असून, या कालावधीत अर्ज करावा.
कशासाठी मिळते?
परदेशातील विद्यापीठात कला, वाणिज्य, विज्ञान अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन शाखांत पदविका, पदवी किवा पदव्युत्तर, पीएच.डी.साठी या योजनेचा लाभ मिळतो.
अर्ज कोठे मिळणार?
www.maharashtra.gov.in वरील संकेतस्थळावर रोजगार या लिंकवर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा. तो भरून आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे ४११००१ येथे सादर करावा.