३.२० मिमी लांब, ३.०६ मिमी उंच चरखा पाहिलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 06:12 AM2023-04-21T06:12:02+5:302023-04-21T06:12:12+5:30

Charkha: महात्मा गांधी यांची ओळख असलेल्या चरख्याच्या आकाराची सर्वांना कल्पना आहे. मात्र नागपूरच्या एका कलावंताने अगदी सूक्ष्म आकाराचा चरखा बनविला आहे आणि त्यावर सूतही कातता येते.

Have you seen the 3.20 mm long, 3.06 mm high Charkha? | ३.२० मिमी लांब, ३.०६ मिमी उंच चरखा पाहिलाय का?

३.२० मिमी लांब, ३.०६ मिमी उंच चरखा पाहिलाय का?

googlenewsNext

नागपूर : महात्मा गांधी यांची ओळख असलेल्या चरख्याच्या आकाराची सर्वांना कल्पना आहे. मात्र नागपूरच्या एका कलावंताने अगदी सूक्ष्म आकाराचा चरखा बनविला आहे आणि त्यावर सूतही कातता येते. अगदी बाेटाच्या ठशावर येणारा ३.२० मिलिमीटर लांब, २.६८ मिमी रुंद, ३.०६ मिमी उंच आणि अवघ्या ४० मिलिग्रॅम वजनाचा हा चरखा नागपूरच्या जयंत तांदुळकर या कलावंताने बनविला आहे. या चरख्याची नुकतीच लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नाेंद झाली आहे. 

स्वावलंबी भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न म्हणून तांदुळकर यांनी हा चरखा तयार केला आहे. तांदुळकर हे झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी असून, महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल या पदावर कार्यरत आहेत. तांदुळकर यांना वेगवेगळ्या कलाकृती साकारण्याचा छंद आहे. 

लिम्का बुकमध्ये नाेंद
यासाठी लहान लाकडी काड्या, स्टील तार आणि कापूस धागा इत्यादी वस्तूंचा वापर केला आहे. वैशिष्ट्य म्हणजे, एवढ्या लहान आकाराचा चरखा असूनही त्यावर सूत कातण्याचे कार्य करता येते. या चरख्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१ आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये २०२२ मध्ये नाेंद झाली आहे आणि आता २०२३ ला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही नोंद घेत प्रमाणपत्र दिले आहे.

Web Title: Have you seen the 3.20 mm long, 3.06 mm high Charkha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई