कहर कायम; राज्यात दैनंदिन रुग्णांसह मृत्युसंख्येचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:07 AM2021-04-22T04:07:16+5:302021-04-22T04:07:16+5:30

दिवसभरात ६७,४६८ नवे काेराेनाबधित : ५६८ जणांनी गमावला जीव लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कठोर निर्बंधानंतरही कोरोनाचा कहर ...

Havoc persists; High mortality rate with daily patients in the state | कहर कायम; राज्यात दैनंदिन रुग्णांसह मृत्युसंख्येचा उच्चांक

कहर कायम; राज्यात दैनंदिन रुग्णांसह मृत्युसंख्येचा उच्चांक

Next

दिवसभरात ६७,४६८ नवे काेराेनाबधित : ५६८ जणांनी गमावला जीव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कठोर निर्बंधानंतरही कोरोनाचा कहर कायम असून, बुधवारी पुन्हा दैनंदिन रुग्ण आणि मृत्युसंख्येची उच्चांकी नोंद झाली. राज्यात दिवसभरात ६७ हजार ४६८ रुग्णांचे निदान झाले असून, ५६८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ४० लाख २७ हजार ८२७ झाली असून, मृतांचा आकडा ६१ हजार ९११ झाला आहे.

यापूर्वी, मंगळवारी दैनंदिन मृत्यूंच्या उच्चांकाची नोंद झाली होती. २० एप्रिल रोजी ५१९ मृत्यू झाले होते, तर १७ एप्रिल रोजी दिवसभरात सर्वाधिक म्हणजे ६७ हजार १२३ रुग्णांचे निदान झाले होते. सध्या राज्यात ६ लाख ९५ हजार ७४७ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

राज्यात दिवसभरात ५४ हजार ९८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३२ लाख ६८ हजार ४४९ रुग्ण काेराेनामुक्त झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१५ टक्के असून मृत्युदर १.५४ टक्के आहे. राज्यात ३९ लाख १५ हजार २९२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २८ हजार ३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हा सक्रिय रुग्ण

पुणे १,१२,२८४

मुंबई ८३,४५०

नागपूर ८०,१५५

ठाणे ७८,४७३

......................

नाशिक ४६,२५३

तारीख रुग्ण मृत्यू

२१ एप्रिल६७,४६८ ५६८

२० एप्रिल६२,०९७ ५१९

१९ एप्रिल ५८,९२४ ३५१

१८ एप्रिल ६८,६३१ ५०३

१७ एप्रिल ६७,१२३ ४१९

१६ एप्रिल ६३,७२९ ३९८

१५ एप्रिल ६१,६९५ ३४९

१४ एप्रिल ५८,९५२ २७८

Web Title: Havoc persists; High mortality rate with daily patients in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.