ईडीच्या याचिकेवर उत्तर द्या, संजय राऊत यांना उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 05:36 AM2022-11-12T05:36:42+5:302022-11-12T05:36:59+5:30

शिवसेना नेते संजय राऊत यांची विशेष पीएमएलए न्यायालयाने केलेली जामिनावरील सुटका रद्द करावी

HC directs Sanjay Raut to reply to ED plea | ईडीच्या याचिकेवर उत्तर द्या, संजय राऊत यांना उच्च न्यायालयाचे निर्देश

ईडीच्या याचिकेवर उत्तर द्या, संजय राऊत यांना उच्च न्यायालयाचे निर्देश

Next

मुंबई :

शिवसेना नेते संजय राऊत यांची विशेष पीएमएलए न्यायालयाने केलेली जामिनावरील सुटका रद्द करावी, यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने संजय राऊत व प्रवीण राऊत यांना शुक्रवारी दिले.

ईडीने विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले त्यावेळी त्यांच्याकडे न्यायालयाच्या निकालाची प्रत उपलब्ध नव्हती. त्यामुळे ईडीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी न्या. भारती डांगरे यांच्या एकलपीठाकडे मागितली. त्यावर न्यायालयाने त्यांना याचिकेत १४ नोव्हेंबरपर्यंत सुधारणा करण्याची परवानगी दिली. तसेच संजय व प्रवीण राऊत यांना १० दिवसांत या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश देत याचिकेवरील पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी ठेवली. 

सिंग यांनी ही सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी ठेवण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली नाही. ‘प्रत्येक आदेशात काहीतरी टिपणी केली जाते आणि त्याचा परिणाम होतो. एक- दोन दिवस विलंबाने सुनावणी घेतली तर फरक पडत नाही,’ असे न्या. डांगरे यांनी म्हटले.

Web Title: HC directs Sanjay Raut to reply to ED plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.