स्पोर्ट्स कारची जप्ती पडली महागात मालकांना परत करण्याचे हायकोर्टाचे पोलिसांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 01:12 PM2024-02-03T13:12:43+5:302024-02-03T13:13:08+5:30
Mumbai: पोलिसांनी केलेल्या कारवाईला कोणताही कायदेशीर आधार नाही, अशा शब्दांत सुनावत उच्च न्यायालयाने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पोलिसांना २६ जानेवारी रोजी जप्त केलेल्या ३१ महागड्या स्पोर्ट्स कार त्यांच्या मालकांना परत करण्याचे आदेश दिले.
मुंबई - पोलिसांनी केलेल्या कारवाईला कोणताही कायदेशीर आधार नाही, अशा शब्दांत सुनावत उच्च न्यायालयाने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पोलिसांना २६ जानेवारी रोजी जप्त केलेल्या ३१ महागड्या स्पोर्ट्स कार त्यांच्या मालकांना परत करण्याचे आदेश दिले. त्यात लम्बोर्गिनी, फेरारी यासारख्या गाड्यांचा समावेश आहे.
कार जप्त केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची बाब न्या.अनुजा प्रभुदेसाई व न्या. एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठाने अधोरेखित करत पोलिसांना खडसावले. प्रजासत्ताक दिनानिमित्त एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने गाड्यांची रॅली आयोजित केली होती. ऑनलाइन पोर्टलवर तिकिटांची विक्रीही कंपनीने केली. सर्व गाड्या मॉलजवळ जमल्या त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांना कार परत करण्याची विनंती करूनही त्यांनी परत केल्या नाहीत, अखेरीस कार मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.