एचडीएफसी बँक ग्राहकांना जीपीएसचे पैसे परत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:17+5:302021-07-14T04:09:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने गेल्या सहा वर्षांत वाहन कर्ज घेतलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने गेल्या सहा वर्षांत वाहन कर्ज घेतलेल्या ग्राहकांना जीपीएस यंत्रणेचे कमिशन परत देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा नुकतीच करण्यात आली. एचडीएफसी बँकेने वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन हे कमिशन परत देणार असल्याची माहिती दिली आहे.
२०१४ ते २०२० या कालावधीत वाहन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना जीपीएसचे कमिशन परत केले जाणार आहे. परताव्याची ही रक्कम ग्राहकांच्या नोंदणीकृत खात्यात जमा होणार आहे. बँकेने यासाठी ग्राहकांना एक महिना संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे.
ग्राहकांना कर्जासोबत १८००० रुपयांहून अधिक किमतीचे जीपीएस खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आरोप बँकेवर करण्यात आला होता. पण या जीपीएसमुळे वाहनांचा ठावठिकाणा समजू शकेल, असा आक्षेप घेण्यात आला होता.
आरबीआयने बँकेच्या इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सिस्टिममधील त्रुटी दूर करेपर्यंत बँकेला नवीन क्रेडिट कार्ड देण्यास स्थगिती दिली होती. त्यावर एचडीएफसी बँकेने सांगितले आहे की, निलंबित सेवा सुरू करण्यासाठी आम्ही सातत्याने आरबीआयच्या संपर्कात आहोत; पण ती कधी पूर्ववत होईल याची माहिती देणे अवघड आहे. नेटवर्कशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी डिजिटल फॅक्ट्री, इंटरप्राइज फॅक्ट्री मोहीम राबवण्यात येणार आहे, असेही बँकेने म्हटले आहे.