एचडीएफसीच्या उपाध्यक्षाची बढतीच्या ईर्षेतून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 06:50 AM2018-09-10T06:50:38+5:302018-09-10T06:50:56+5:30

एचडीएफसी बँकेच्या उपाध्यक्षपदी वयाच्या ३७व्या वर्षीच बढती मिळाल्याच्या ईर्षेतून एका सहकाऱ्याने सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

HDFC's Vice President raised the jealousy of murder | एचडीएफसीच्या उपाध्यक्षाची बढतीच्या ईर्षेतून केली हत्या

एचडीएफसीच्या उपाध्यक्षाची बढतीच्या ईर्षेतून केली हत्या

Next

मुंबई : एचडीएफसी बँकेच्या उपाध्यक्षपदी वयाच्या ३७व्या वर्षीच बढती मिळाल्याच्या ईर्षेतून एका सहकाऱ्याने सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यात निर्जन स्थळी त्यांचा मृतदेह फेकल्याची माहिती मारेक-याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांचे पथके रवाना झाली आहेत.
मलबार हिल येथील रहिवासी असलेले संघवी हे कमला मिलमध्ये एचडीएफसीच्या बँकेच्या कार्यालयात कार्यरत होते. ५ सप्टेंबरला रात्री दैनंदिन काम संपवून ते निघाले. मात्र, ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी ६ सप्टेंबरला तक्रार दिली. शुक्रवारी कोपरखैरणेच्या सेक्टर १९ मध्ये त्यांची कार सापडली. त्यामध्ये रक्ताचे डाग, तसेच चाकू आढळून आला. रविवारी नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने सरफराज शेख या तरुणाला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली दिली.
संघवी काम संपवून कार घेण्यासाठी पार्किंग लॉटमध्ये गेले. तेथेच दबा धरून असलेल्या मारेक-यांनी चाकूने वार करत त्यांची हत्या केली. रात्री सव्वाअकराच्या सुमारास त्यांची गाडी परळच्या धनमिल नाका परिसरातून जाताना दिसली. त्यामुळे तब्बल दोन ते तीन तास कमला मिलच्या पाचमजली पार्किंग लॉटमध्येच हत्याकांडाचा थरार घडला, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. संघवींना नुकतीच बढती देण्यात आली होती. आपल्याला डावलून संघवींना बढती देण्यात आल्याचा राग एका सहका-याच्या मनात होता. त्यानेच संघवी यांचा काटा काढण्यासाठी त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Web Title: HDFC's Vice President raised the jealousy of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.