Join us

‘तो’ पोलीसही निलंबित, आंदोलनाचा दिला होता इशारा, मुंबई दलातील दुसरा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:28 AM

मुंबई पोलीस दलातील अंमलदारांची नाराजी दिवसेंदिवस समोर येत आहे. पोलिसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भीक मांगो आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा देणाऱ्या कॉन्स्टेबल प्रमोद गिरधर पाटील यांना खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.

- जमीर काझीमुंबई : मुंबई पोलीस दलातील अंमलदारांची नाराजी दिवसेंदिवस समोर येत आहे. पोलिसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भीक मांगो आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा देणाऱ्या कॉन्स्टेबल प्रमोद गिरधर पाटील यांना खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. बेशिस्त, बेजबाबदार व खात्याची प्रतिमा मलिन करण्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अंमलदाराला अशा प्रकारे निलंबित करण्याची मुंबई पोलीस दलातील गेल्या महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. ९ मे रोजी कॉन्स्टेबल ज्ञानेश अहिरराव यांना निलंबित करण्यात आले आहे.अहिरराव यांना वेतन वेळेतन मिळाल्याने तर पाटील यांनी पोलिसांच्या अनेक महिन्यांपासूनच्या प्रलंबित मागण्यांसाठी भीक मागण्याचा इशारा दिला होता.तसेच ४ ते २३ जून या कालावधीत आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाची परवानगी मागितली होती. ती नाकारल्यानंतरही त्यांनी आझादमैदान पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाला आंदोलनाबाबतचेपत्र दिल्याने बुधवारी ही कारवाई करण्यात आली.प्रमोद पाटील हे सशस्त्र दलाच्या (एलए) मरोळ येथील मुख्यालयात कार्यरत असून वैद्यकीय उपचारासाठी त्यांना अर्जित, धनार्जित अशी एकूण ४५ दिवसांची रजा २२ मे रोजी मंजूर करण्यात आली आहे. पाटील यांनी पोलिसांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध या कालावधीतील ४ ते २३ जून यादरम्यान आझाद मैदानावर येथे भीक मांगो व बेमुदत उपोषणासाठी ४ जूनपासून रजेबाबत ३१ मे रोजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांनी १ जून रोजी त्यांना त्याबाबतचे लेखी उत्तर दिले. पाटील यांनी पत्र वाचले परंतु स्वाक्षरी करून स्वीकारण्यास नकार देऊन ते निघून केले. त्यानंतर दुसºया दिवशी त्यांना पुन्हा बोलावून त्यांच्यावरील अन्यायाबाबत नेमका उल्लेख नसल्याने त्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. त्यानंतरही पाटील हे सोमवारी ड्युटीवर गैरहजर राहिले. त्याचबरोबर ५ जूनपासून आझाद मैदानावर पोलिसांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनकरणार असल्याचे पत्र आझादमैदान पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले.त्याचे हे वर्तन बेशिस्त व खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत प्राथमिक चौकशीला अधीन ठेवत मरोळ सशस्त्र दल मुख्यालयाचे उपायुक्त वसंत जाधव यांनी बुधवारी त्यांच्या निलंबनाचा आदेश बजावला.कॉन्स्टेबल पाटील यांच्या मागण्याकॉन्स्टेबल पाटील यांनी पोलीस युनियन झालीच पाहिजे, पोलीस मतदारसंघाला राज्य सरकारने मंजुरी द्यावी, पोलिसांना चांगल्या वैद्यकीय सुविधा द्याव्यात, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, सातव्या वेतन आयोगात महसुलाप्रमाणे लाभ देण्यात यावा आदी मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा दिला होता.पोलीस पत्नी व पोलीस बॉईज संघटनेतर्फे गेल्या दोन वर्षांपासून या मागण्या करण्यात येत आहेत. त्यासाठी आंदोलनेही झालेली आहेत.मुंबई पोलीस दलात लागोपाठ घडणाºया या घटना योग्य नसून त्यामुळे खात्याची बदनामी होत आहे. प्रत्येकाने शिस्त बाळगणे अत्यावश्यक आहे. शिस्तीच्या अधीन राहून वर्तन व्हावे. त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकाºयांनीही अंमलदारांच्या समस्या व अडचणी गांभीर्याने समजावून घेत तत्परतेने ते सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे- डॉ. माधव सानप, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक

टॅग्स :पोलिस