‘तो’ विमानतळ कर्मचारी प्रवाशांसाठी ठरला देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:09 AM2021-08-18T04:09:27+5:302021-08-18T04:09:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेला एक कर्मचारी प्रवाशांसाठी देवदूत ठरला आहे. प्रवाशांनी ...

‘He’ became an angel for airport staff passengers | ‘तो’ विमानतळ कर्मचारी प्रवाशांसाठी ठरला देवदूत

‘तो’ विमानतळ कर्मचारी प्रवाशांसाठी ठरला देवदूत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेला एक कर्मचारी प्रवाशांसाठी देवदूत ठरला आहे. प्रवाशांनी घाईघाईत विमानतळावर विसरलेल्या मौल्यवान वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवत या कर्मचाऱ्याने आपल्या कामाप्रती निष्ठा दाखवून दिली आहे.

नरेश गौडा असे या विमानतळ कर्मचाऱ्याचे नाव आहे. जोधपूरहून मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या एका प्रवाशाने आपला महागडा आयपॅड बेल्ट क्रमांक ११ जवळ ठेवला होता. विमानतळावरून घाईघाईने निघताना तो आयपॅड तेथेच विसरला. घरी पोहोचल्यानंतर हा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने त्याबाबत हेल्पलाइनवर माहिती देताच नरेश गौडा आपल्या कामाला लागले. त्यांनी विमानतळाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला असता बेल्ट ११ जवळ आयपॅड दिसून आला. तत्काळ वरिष्ठांशी संपर्क साधून संबंधित प्रवाशाचा आयपॅड त्याला परत केला.

दुसऱ्या घटनेत एक महिला प्रवासी बेकर सेक्शनजवळ आपले सामान विसरून गेली. घरी पोहोचल्यानंतर आपल्यासोबत बॅगेज नसल्याची जाणीव तिला झाली. तत्काळ हेल्पलाइनशी फोन करून तिने तक्रार नोंदवली. त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी नरेश यांच्यावरच देण्यात आली. नरेश यांनी संबंधित महिलेने सांगितलेल्या ठिकाणांवर शोध घेतला असता तिचे बॅगेज निर्गमन द्वारापाशी आढळले. नरेश यांनी ते कार्यालयात जमा केले. ती महिला पुन्हा विमानतळावर पोहोचल्यानंतर तिला संपूर्ण प्रक्रिया समजावून बॅगेज तिच्यापर्यंत पोहोचवण्याची खबरदारीही नरेश यांनी घेतली.

........

इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणा

नरेश यांच्या या कामगिरीचे प्रवाशांनी कौतुक केलेच, पण विमानतळ प्रशासनाकडूनही त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. असे कर्मचारी प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महत्त्वाचे असून, नरेश यांच्यापासून इतर कर्मचारी प्रेरणा घेतील, असे मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: ‘He’ became an angel for airport staff passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.