मेकॅनिकचे प्रताप
मुंबई : पवई पोलिसांनी अटक केलेला सराईत अँक्टिव्हा चोर नसीम सद्दीन खान (४८) याने आपल्या अपंग मुलाच्या उपचारासाठी चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. आतापर्यंत त्याच्याकडून तब्बल ३२ अॅक्टिव्हांसह ६ कार जप्त करण्यात पवई पोलिसांना यश आले आहे.विक्रोळी पार्क साइट येथील कैलास कॉम्प्लेक्सच्या नर्मदा सोसायटीत खान त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. गेल्या २0 वर्षांपासून त्याच परिसरात त्याचा मेकॅनिकचा व्यवसाय आहे. अपंग मुलाच्या उपचारासाठी मेकॅनिकच्या व्यवसायातील पैसा अपुरा पडत होता. यातूनच त्याने वाहनचोरीची शक्कल लढवली. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या अँक्टिव्हाचे पॅनल उघडून तो आतील सॉकेटमधील वायरमध्ये फेरफार करून अवघ्या दोन मिनिटांत चावीचा आधार न घेता गाडी सुरू करीत असे. या चोरीच्या अँक्टिव्हा ठेवण्यासाठी त्याने नातेवाईक, मित्रांचा आसरा घेतला. याच दुचाकीचा वापर तो आपल्या व्यवसायात करू लागला. दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकीमध्ये चोरीच्या दुचाकींमधील पार्ट टाकत असे. दरम्यान, पवईतील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. के. महाडेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी समीर मुजावर यांनी राजाराम कुंभार, संतोष देसाई, अमित जगताप, दिलीप मुसळे, अजय बांदकर आणि हुसेन शेख यांच्यासह तपास सुरूकेला होता. आरोपीचा शोध घेत असताना खान पोलिसांच्या हाती लागला. (प्रतिनिधी) मे