गोरेगाव आग: 'पायाला भाजले, तरी मी धावतच सुटलो होतो'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 09:15 AM2023-10-07T09:15:32+5:302023-10-07T09:15:49+5:30
मुंबई: आम्हाला काही कळतच नव्हते. माळ्यावरील सगळे नागरिक सैरावैरा धावत होते. माझी बायको, मुलगा आणि मुलगी आम्ही सुद्धा जिन्याच्या ...
मुंबई: आम्हाला काही कळतच नव्हते. माळ्यावरील सगळे नागरिक सैरावैरा धावत होते. माझी बायको, मुलगा आणि मुलगी आम्ही सुद्धा जिन्याच्या दिशेने गर्दी केली. तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर सुरक्षित उतरल्याचे आठवतेय. मात्र दुसऱ्या माळ्यावर प्रचंड धूर होता. तो आमच्या सगळ्याच्या शरीरात गेला होता. खोकून खोकून आम्ही हैराण झालो होतो. पहिल्या मजल्यावर माझे पाय भाजले तरी मी जिवाच्या आकांताने पळतच राहिल्याचा प्रसंग सांगताना सुनील भैम्बरे यांचे डोळे पाणावले होते.
भेम्बरे यांचा मुलगा ओमकार याला फार दुखापत झाली नसली, तरी त्यांची पत्नी सुवर्णा या मात्र या घटनेत जखमी झाल्या होत्या. त्यांना गोरेगाव येथील सुविधा हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. तर मुलगी प्रेरणा आगीमुळे भाजली होती. त्यांचे नाव मात्र कूपर रुग्णालयातील मृताच्या यादीत होते. भेम्बरे यांना याची फारशी कल्पना नव्हती, प्रेरणा दालमिया महाविद्यालातयून बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स या विषयातून शिक्षण घेत होती, भेम्बरे यांचा गोरेगाव येथे चप्पलचा स्टॉल आहे.
या घटनेबद्दल अधिक माहिती देताना भेम्बरे सांगतात कि " आम्ही रुग्णालयात आलो. बहुतांश इमातीतील रुग्णांना या आगीच्या घटनेमुळे त्रास झाल्याचे कळत आहे.
बायकोची तब्बेत कशी मला फारशी माहित नाही. परंतु घटना प्रचंड भयानक होती. आगीमुळे माझे दोन्ही पाय भाजले आहेत. बाकीचे कुटुंबातील सदस्य कुठे आहे याचा मात्र शोध लागलेला नाही. मुलगी कूपर रुग्णालयात असल्याचे मला सांगण्यात आले आहे.