सतत भुंकतो म्हणून पाच हजार रुपयांची सुपारी देऊन केली श्वानाची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 01:56 AM2021-03-02T01:56:27+5:302021-03-02T01:57:26+5:30

वर्सोव्यातील प्रकार,  प्रसिद्ध लॉन टेनिसपटू मेघा वखरिया यांच्याकडून हळहळ व्यक्त 

He killed the dog by giving a betel nut worth five thousand rupees for barking constantly | सतत भुंकतो म्हणून पाच हजार रुपयांची सुपारी देऊन केली श्वानाची हत्या 

सतत भुंकतो म्हणून पाच हजार रुपयांची सुपारी देऊन केली श्वानाची हत्या 

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सतत भुंकत राहतो म्हणून एका श्वानाची पाच हजारांची सुपारी देत हत्या करविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वर्सोव्यात सोमवारी उघड झाला. याबाबत प्रसिद्ध भारतीय लॉन टेनिसपटू मेघा वखरिया यांनीही हळहळ व्यक्त केली. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी चौघांना अटक केली असून, यात सोसायटी चेअरमनने हे करविल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 अंधेरीत सात बंगला परिसरात असलेल्या एक्सिस बँकेच्या बाहेर काळ्या पांढऱ्या रंगाचा भटका श्वान राहत होता. याच परिसरात वखरिया यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार त्या आणि त्यांचा एक गृप भटक्या श्वानाना जेऊखाऊ घालतात. त्यापैकीच एक हा श्वान होता; मात्र १५ फेब्रुवारी २०२१ पासून तो गायब झाला होता. ही बाब वखरिया आणि त्यांच्या मित्रांच्या लक्षात आली तेव्हा त्याला हुडकण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली. आसपासची दुकाने, सोसायटी ते पालिकेपर्यंत सर्वांना याबाबत विचारणा करण्यात आली; मात्र तो कुठेच सापडला नाही. दरम्यान, याच परिसरात महावीर २ या इमारतीमधील सुरक्षारक्षक हरी राम याने त्यांना माहिती दिली. ज्यात दोन अनोळखी इसम रिक्षात घालून त्या श्वानाला घेऊन गेल्याचे त्यांना समजले. 
त्यानुसार वर्सोवा पोलिसांना लेखी तक्रार देण्यात आली. 

‘तो’ दिसणार नाही, याचे दुःख! 
‘मुक्या श्वानाबाबत घडलेले कृत्य हे अत्यंत लाजिरवाणे आहे. त्यामुळे अशा लोकांविरोधात कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करणे गरजेचे आहे. तो आता पुन्हा कधीच दिसणार नाही, याचे दुःख होत आहे. 
( मेघा वखरिया - लॉन टेनिसपटू, वैमानिक )

रिक्षाचालक मोहम्मद यासीन मणियार (२७), दोन मारेकरी अरविंद यादव (२७) ,आर ठकरी (२३) आणि सोसायटी चेअरमन सुनील किसनचंद (५१) यांच्या अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांनी दिली. 

श्वानाचे भुंकणे केले कायमचे बंद !
nपोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पडताळले. तेव्हा १२ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता ( MH02FB7531) क्रमांकाच्या रिक्षात आलेल्या दोघांनी त्या श्वानाला नेले. 
nत्यानुसार पोलीस रिक्षा क्रमांकाच्या मदतीने दोघांपर्यंत पोहोचले. तेव्हा श्वानाला मारून फेकण्यात आल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला, ज्यात त्याचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. 

Web Title: He killed the dog by giving a betel nut worth five thousand rupees for barking constantly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.