वो सबकी सुनता है... ऑस्ट्रेलियात पावसाचं आगमन, कांगारूंचा सुखावणारा 'रेन डान्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 08:58 AM2020-01-06T08:58:10+5:302020-01-06T09:13:25+5:30

ऑस्ट्रेलियात दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने जंगलात आगीचा हंगाम सुरू झाला.

He listens to everyone ... Rapture in the world as the rain arrives in Australia bushfire | वो सबकी सुनता है... ऑस्ट्रेलियात पावसाचं आगमन, कांगारूंचा सुखावणारा 'रेन डान्स'

वो सबकी सुनता है... ऑस्ट्रेलियात पावसाचं आगमन, कांगारूंचा सुखावणारा 'रेन डान्स'

googlenewsNext

मेलबर्न - ऑस्ट्रेलियात लागलेल्या भयंकर आगीच्या झळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचल्या. या आगीत भस्मसात झालेल्या प्राणी अन् पक्षांचे छायाचित्र पाहून कोट्यवधींचे ह्रदय पिघळले. या कोट्यवधी नागरिकांनी निसर्गाकडे, देवाकडे तेथील स्थिती आटोक्यात यावा म्हणून प्रार्थना केली. तर, ऑस्ट्रेलियातील नागरिकांनीही एकत्र येत देवाचा धावा केला. अखेर, या सर्वांची प्रार्थना त्याने ऐकली अन् ऑस्ट्रेलियात वरुण राजाचं आगमन झालं. 

ऑस्ट्रेलियात दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने जंगलात आगीचा हंगाम सुरू झाला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा जीव गेलाय. येथील जंगलात लागलेल्या आगीत आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. या निसर्गचक्राच्या फेऱ्यात जवळपास 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये हजारो लाखो प्राण्यांचा समावेश आहे. दरम्यान, या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी 3 हजार रिजर्व्ह सैनिकांना बोलावून घेतले आहे.


ऑस्ट्रेलियातील या आगीची तीव्रता पाहून जगभरातील लोकांनी प्राणी-पक्षी अन् माणसांसाठी प्रार्थना केली. वो सब की सुनता है... असंच काहीसं दिसून आलं. प्रार्थनेच्या काही तासांतच ऑस्ट्रेलियात पावसाचं आगमन झालं. या पावसाच्या आगमनाने तेथील मनुष्य, प्राणी अन् पक्षांनी अत्यानंद साजरा केला. या पावसाच्या स्वागतात चक्क कंगारूंनी नाचून नाचून पावसाच्या सरी आपल्या अंगावर घेतल्या. तर, मदत व बचावकार्य करणाऱ्या तेथील जवानाने दोन्ही हात आभाळाच्या दिशेने उंचावत निसर्गाचे घन्यवाद मानले. तेथील सोशल मीडियावर हे दोन्ही फोटो शेअर होत आहेत. तर, ट्विटरवरुनही ऑस्ट्रेलियातील पावसाचा आनंद साजरा होताना दिसत आहे. 

दरम्यान, युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट यांच्या संशोधनानुसार या आगीत 480 मिलियन्स म्हणजेच जवळपास 48 कोटी प्राणी अन् पक्षांचा जीव गेला आहे. दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीच हंगाम सुरू झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे प्राण गेले आहेत. 

Web Title: He listens to everyone ... Rapture in the world as the rain arrives in Australia bushfire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.