मेलबर्न - ऑस्ट्रेलियात लागलेल्या भयंकर आगीच्या झळा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचल्या. या आगीत भस्मसात झालेल्या प्राणी अन् पक्षांचे छायाचित्र पाहून कोट्यवधींचे ह्रदय पिघळले. या कोट्यवधी नागरिकांनी निसर्गाकडे, देवाकडे तेथील स्थिती आटोक्यात यावा म्हणून प्रार्थना केली. तर, ऑस्ट्रेलियातील नागरिकांनीही एकत्र येत देवाचा धावा केला. अखेर, या सर्वांची प्रार्थना त्याने ऐकली अन् ऑस्ट्रेलियात वरुण राजाचं आगमन झालं.
ऑस्ट्रेलियात दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने जंगलात आगीचा हंगाम सुरू झाला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा जीव गेलाय. येथील जंगलात लागलेल्या आगीत आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. या निसर्गचक्राच्या फेऱ्यात जवळपास 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये हजारो लाखो प्राण्यांचा समावेश आहे. दरम्यान, या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी 3 हजार रिजर्व्ह सैनिकांना बोलावून घेतले आहे.