Join us

नोकरी गेली, टॅक्सी चालवून ओढला संसाराचा गाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 4:21 AM

स्मिता झगडेंच्या जिद्दीची कथा : जगण्यासाठी सकारात्मकता गरजेची ; लॉकडाऊनचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योगधंद्यांचे नुकसान झाले आहे. कित्येक जण बेरोजगार झाले आहेत, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मात्र नोकरी गेली म्हणून हातावर हात न धरता चिंचपोकळी येथील एका महिलेने टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली. स्मिता झगडे असे या महिला टॅक्सीचालकाचे नाव आहे.स्मिता झगडे या चिंचपोकळी येथील शोरूममध्ये काम करत होत्या. परंतु लॉकडाऊनमध्ये हे शोरूम बंद होते, तर कर्मचाऱ्यांना पर्यायी नोकरी शोधण्यास सांगण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर पैशांची चणचण भासत होती. एका महिलेने टॅक्सी चालवणे हा विचार तसा सहजासहजी कोणालाही न पटणाराच.पाय ओढणाºया आपल्याच लोकांचा नेहमीचा बुरसटलेला प्रश्न तयार होताच, लोक काय म्हणतील हे अपेक्षित होतेच, पण त्यांनी धाडसाने या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.एका राजकीय पक्षाने २०१२मध्ये महिलांना टॅक्सी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले, तेव्हा प्रशिक्षण घेतले होते. बॅच आणि परवाना मिळाला होता. त्यानंतर एका शोरूममध्ये नोकरी केली. आता टॅक्सी चांगल्यारीतीने चालवता येते. आता याचा उपयोग करायचा असे त्यांनी ठरवले. भावाची टॅक्सी होती, टॅक्सी सुरू केल्यानंतर खूप चांगली माणसे भेटली, रस्ते माहिती पडले.वाहन चालवत असताना मुंबईच्या रस्त्यांची पुरेशी माहिती नसते तेव्हा प्रवाशांनाच विनंती करण्याची त्यांची तयारी असते. प्रवाशांशी वागताना सौजन्य हा महत्त्वाचा गुणधर्म त्यांचा अंगी जाणवला.प्रवाशांना प्रतीक्षेत असताना चालक सीटवर महिला पाहून कधी कधी लोक न विचारताच पुढे जातात. बरेचदा लोकांना कुतूहल वाटते. टॅक्सी सुरू केल्यानंतर खूप चांगली माणसे भेटली, रस्ते माहिती पडले.गाडी मागे घेऊन महिलाच टॅक्सी चालवते का ते पाहायला येतात, असे स्मिता झगडे यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी सुरू ठेवली होती. रुग्ण, डॉक्टर, नर्स यांना सेवा देत होते. नायर रुग्णालयातून ब्रीच कँडी रुग्णालयात येथे एका अंध रुग्णाला घेऊन जात असताना तिथे बाजूला असलेल्या वाहतूक पोलिसांनी बाजूला टॅक्सी उभी करण्यास सांगितले. टॅक्सीचा फोटो काढून ५०० रुपयांचा दंड आकारला. पोलिसांनी कारवाई करावी, पण योग्य चौकशी करायला हवी. ओल्यासोबत सुकेही जाळू नये, असे त्या म्हणाल्या.आव्हानांना सामोरे जावेवाहन चालवण्यात धोका आहेच. कोणी कसे वाहन चालवतात, माणसे कशी भेटतात. पण आपण धाडस केले नाही तर कोणत्या समस्या येतात, त्यावर काय सोल्युशन काढावे हे समजणार नाही. कोणतीही गोष्ट न करता थांबू नका. आव्हानांना सामोरे जा, स्वत: त्या क्षेत्रात उतरा, मग पुढे पुढे मार्ग मिळत जाईल.- स्मिता झगडे, टॅक्सी चालक