‘त्याने’ नियंत्रण कक्षाला केले १४०० कॉल...; कॉलरची मानसिक स्थिती बिघडल्याचे निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 06:47 IST2025-02-13T06:47:10+5:302025-02-13T06:47:32+5:30

त्या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याने आतापर्यंत १४०० हून अधिक वेळा मुंबई पोलिसांना कॉल केल्याचे स्पष्ट झाले.

'He' made 1400 calls to the control room...; Caller mental state revealed to be deteriorating | ‘त्याने’ नियंत्रण कक्षाला केले १४०० कॉल...; कॉलरची मानसिक स्थिती बिघडल्याचे निष्पन्न

‘त्याने’ नियंत्रण कक्षाला केले १४०० कॉल...; कॉलरची मानसिक स्थिती बिघडल्याचे निष्पन्न

मुंबई - पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याच्या धमकीच्या कॉलने पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. तपासात कॉल खोटे असल्याचे आणि ते करणाऱ्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे स्पष्ट झाले. त्याने आतापर्यंत १४०० हून अधिक कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात मंगळवारी हा कॉल आला होता. “पंतप्रधान मोदी अमेरिकेला जात असलेल्या विमानात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवणार आहेत. मी याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. त्या दहशतवाद्याने गेल्या महिन्याभरात सहा विमानांचे अपघात घडवले आहेत. तोच अमेरिकी दहशतवादी पंतप्रधानांच्या विमानात बॉम्बस्फोट घडवणार आहे”, असे कॉल करणाऱ्या व्यक्तीने अधिकाऱ्यांना सांगितले. त्या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याने आतापर्यंत १४०० हून अधिक वेळा मुंबई पोलिसांना कॉल केल्याचे स्पष्ट झाले.

गेल्यावर्षी १०० कॉल 
गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० कॉल मुंबई पोलिसांना आले होते. ऑक्टोबरमध्ये अशा धमक्यांच्या कॉलने शंभरी गाठल्याचे पाहायला मिळाले. 

त्या महिलेचे ३० हून अधिक कॉल 
एका महिलेनेही यापूर्वी ३० हून अधिक वेळा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करून खोटी माहिती दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडत आहे.

लंडन, फ्रान्समधूनही धमक्यांचे संदेश...
गेल्यावर्षी देशभरात विमानांबाबतच्या धमक्यांचे २०० हून अधिक संदेश संबंधित यंत्रणांना आले होते. यात, आयपी ॲड्रेसनुसार काही संदेश लंडन, जर्मनी आणि फ्रान्स येथील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी त्यासाठी व्हीपीएन सुविधेचा वापर करत होते.  त्या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता  सूड बुद्धीने कॉल केल्याचे स्पष्ट झाले होते. 

Web Title: 'He' made 1400 calls to the control room...; Caller mental state revealed to be deteriorating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.