Join us

मंत्रीपदात रस नाही रस्त्यावर उतरून नागरिकांची कामे करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 6:28 PM

येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मुंबईतून खासदार गोपाळ शेट्टी यांचा समावेश होणार असल्याचे संकेत वर्तवले होते.

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मुंबईतून खासदार गोपाळ शेट्टी यांचा समावेश होणार असल्याचे संकेत काल प्रसिद्धीमाध्यमांनी वर्तवले होते. मात्र आपल्याला मंत्रीपदात रस नाही रस्त्यावर उतरून आपल्या पुढील चार वर्षांच्या खासदरकीच्या कारकीर्दीत नागरिकांची कामे करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणार असल्याची माहिती दस्तुरखुद्द उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतच्या सदर प्रतिनिधीला  दिली.

माझ्या सारख्या सामान्य परिवारतून येऊन भारतीय जनता पक्षात नगरसेवक ते खासदार पदापर्यंत ७ वेळा निवडणूक लढण्याची संधी पक्षाने देणे आणि कार्यकर्ताने निस्वार्थ काम करणे आणि मतदाराने पहिल्या पेक्षा अधिक मताने  निवडून येणे हे मला वाटते मंत्री मंडळात स्थान मिळविण्यापेक्षा मोठ आहे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री मंडळात मागिल ५ वर्षात मुंबई शहरातील वजनदार मंत्रीगण या पदावर असताना देखील अद्याप संरक्षण खात्याच्या जागेभोवती आसपास असणाऱ्या जुन्या इमारतींना बांधकाम परवानगी मिळत नाही. माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर परीकर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्त्नाने २०१६ साली सदर परवानगी देण्यात आली होती. परंतू मनोहर परीकरांच्या निधनानंतर सरकारने  घेतलेला निर्णय अमान्य करत संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुंन्हा काम थांबवण्याचे परिपत्रक काढले जे पूर्ण चूकीचे आहे अशी टिका त्यांनी केली . राज्य शासनाने नुकताच दि,२२ जून  रोजी पुन्हा शुद्धिपत्रक  काढून सन २०१६ साली काढलेला आदेश कायम असल्याचे सुचवले आहे.नेव्ही आस्थापना जवळपास असलेल्या सन २०१० साली तोडण्यात आलेला इमारतीना अद्याप परवानगी दिल्या जात नाहीत. पालिका आयुक्त तसेच राज्य शासन कोणतीच भूमिका घेत नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मी आजही या गोष्टीचा पाठपुरावा करीत असून आपल्या पुढील चार वर्षे खासदारकीची काळात तो करत राहणार आहे. लोकशाही व्यवस्थेत शाशन निर्णय मोठा की अधिकाऱ्यांना नियम मोडण्याचे अधिकार जास्त आहेत हे मला दाखवून द्यायचं आहे असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार म्हणून गेले सहा वर्ष मी माझे सर्व आयुधे वापरली आहेत. आता लोकशाही मार्गानेच रस्तावर उतरुन आंदोलन करणे बाकी आहे.आणि ते मी करणार असून मला कृपया अनअपेक्षित मंत्री मला करू नका. लोकांचे अधिकार लोकांना मिळवून जर देता येत नसतील तर मंत्रीपद तर सोडाच लोकप्रतिनिधी देखील कोणी होऊ नये असे माझे स्पष्ट मत खासदार शेट्टी यांनी शेवटी व्यक्त केले.

 

टॅग्स :सामाजिकमुंबई