Join us  

‘तो’ पोलीस नाईक गजाआड

By admin | Published: April 14, 2016 1:28 AM

दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या पोलीस नाईकाने दुचाकीला धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून पोलीस नाईकाला अटक केली

ठाणे : दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या पोलीस नाईकाने दुचाकीला धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून पोलीस नाईकाला अटक केली आहे. बुधवारी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. पुरुषोत्तम आयातराम (४९) असे अटक केलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे. तो राबोडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास तो दारू पिऊन कारने समतानगर येथील साई आनंद भवन येथून भरधाव वेगाने जात होता. याठिकाणी शैलेंद्र जयस्वाल आणि त्यांचा मित्र शिवकुमार हे दोघे दुकान बंद करून रस्त्यावरील उभ्या असलेल्या दुचाकीवर गप्पा मारत होते. त्या वेळी आयातराम याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याची कार लोखंडी गेटवर जाऊन धडकली. यामध्ये शैलेंद्र किरकोळ जखमी झाला. याप्रकरणी राजकुमार जयस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. त्यानंतर, त्याला अटक केली. अपघाताच्या वेळी तो नशेत असल्याची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.जी. गावित यांनी दिली. पुरुषोत्तम आयातराम (४९) असे अटक केलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे. तो राबोडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास तो दारू पिऊन कारने समतानगर येथील साई आनंद भवन येथून भरधाव वेगाने जात होता.