Join us

ज्येष्ठांशी ममत्वाने वागून त्यांची काळजी घेण्याचे संस्कार प्रशिक्षणात मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रशिक्षण - प्रमाणपत्र आणि प्लेसमेंट देऊन त्यानंतरही एक महिना मेंटाॅरशिप ठेवणारे हे ट्रेनिंग असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रशिक्षण - प्रमाणपत्र आणि प्लेसमेंट देऊन त्यानंतरही एक महिना मेंटाॅरशिप ठेवणारे हे ट्रेनिंग असून, त्यामुळे ज्ञानात व आत्मविश्वासात भर पडलीच; परंतु रूग्णसेवेबरोबरच घरातल्या ज्येष्ठांशी ममत्वाने वागून त्यांची काळजी घेण्याचे संस्कारही या प्रशिक्षणात मिळाले, असे मनोगत तीन प्रशिक्षणार्थींनी प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केले.

समाजाची गरज लक्षात घेऊन महिला आर्धिक विकास महामंडळ (माविम) आणि रिजनल रिसोर्स ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिक रूग्णसेवा प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्र वितरण सोहळा माविमच्या जिल्हा कार्यालयात संपन्न झाला. यावेळी तीन प्रशिक्षणार्थी बोलत होते. माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, भारती कामडी, रंजना म्हसकर, डाॅ. उज्ज्वला काळे, निर्मला सामंत प्रभावळकर, अमृता पाटील, डाॅ. रेखा भातखंडे, डाॅ. अदिती कोल्हे, डाॅ. केजल जसानी, गायत्री साठे, मधुरा साटम, मानसोपचारतज्ज्ञ अमृता लवेकर यांचे सहकार्य या कार्यक्रमाला मिळाले.