‘तो’ हवालदार मात्र उपेक्षितच राहिला..

By admin | Published: November 26, 2014 02:26 AM2014-11-26T02:26:29+5:302014-11-26T02:26:29+5:30

नागरिकांचे प्राण वाचविणा:या पोलिसाच्या कर्तबगारीची गेल्या 6 वर्षात साधी दखलही घेतली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

'He' remained unaware of the constable. | ‘तो’ हवालदार मात्र उपेक्षितच राहिला..

‘तो’ हवालदार मात्र उपेक्षितच राहिला..

Next
जमीर काझी - मुंबई
‘26/11’च्या सहांरक हल्ल्याच्या  कटू स्मृतीला उजाळा देत राज्यातील नागरिक व पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असल्याचा दावा करणा:या गृहखात्याने  स्वत:च्या जिवावर उदार होऊन ताज हॉटेल व परिसरातील शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण वाचविणा:या पोलिसाच्या कर्तबगारीची  गेल्या 6 वर्षात साधी दखलही घेतली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अतिरेक्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी एनएसजी कमांडो येईर्पयत ‘ताज’मधील  घडामोडी आणि परिसरात लपविलेल्या आरडीएक्सच्या जिवंत साठय़ाची माहिती ‘कंट्रोल रूम’ला तत्परतेने देणा:या चालक-हवालदाराला शौर्यपदक देणो तर दूरच कौतुकाचे साधे पत्रही गृह व मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिका:यांनी  दिलेले नाही. हल्ल्याच्या घटनेवेळी परिमंडळ-1चे तत्कालीन उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासमवेत कारवाईत भाग घेतलेला त्यांचा मोटारचालक लतिफ तडवी यांची ही कैफियत आहे. हल्ल्याच्या वेळी कोणत्याच ठिकाणी उपस्थित नसलेल्या अनेकांनी वरिष्ठांच्या मर्जीमुळे कागदपत्रे बनवून ‘शौर्यपदक’ मिळविल्याची अनेक उदाहरणो आहेत मात्र तडवींनी वायरलेसवरून दिलेल्या माहितीचे रेकॉर्ड नियंत्रण कक्ष व क्राईम ब्रॅचकडे उपलब्ध असतानाही त्यांच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले. 
‘26/11’च्या रात्रीची घटना
झोन-1चे तत्कालीन उपायुक्त विजय नांगरे-पाटील यांचा नाईट राऊंड असल्याने त्यांचे चालक लतिफ तडवी व ऑपरेटर अमित खेतले यांना त्यांनी रात्री 11 वाजता  घरी येण्याची सूचना केल्याने सीएसटीसमोरील कार्यालयात थांबून होते. मात्र 9.25च्या सुमारास कुलाब्यात गोळीबार  सुरू झाल्याची माहिती आल्याने त्यांनी त्यांना तातडीने बोलावून घटनास्थळी रवाना झाले. रीगलच्या चौकाजवळ त्यांना ताज हॉटेलच्या मुख्य गेटजवळ मोठय़ा प्रमाणात गोळीबार सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितल्याने तडवींनी ताजच्या मागच्या बाजूला कर्मचा:यांसाठी असलेल्या दाराजवळ गाडी नेली. नांगरे-पाटील व ऑपरेटर मागच्या दरवाजातून आत शिरण्याचा प्रय} करीत असताना तडवी त्यांच्या सूचनेनुसार कंट्रोलरूमला माहिती  देऊन मदत पाठविण्याची मागणी करीत होते. त्याचबरोबर ताजमधील देशी-परदेशी पर्यटकांना बाहेर काढून यलो गेट-1च्या बाजूला नेऊन सोडत होते. गोळीबार व आरडाओरडीमुळे माहिती देता येत नसल्याने तडवी यांनी उपायुक्तांच्या सूचनेनुसार गाडी कुलाबा पोलीस स्टेशनच्या मार्गावर नेऊन  कंट्रोलरूमशी संपर्क साधला. त्याचवेळी  ताजच्या पाठीमागील गल्लीतील गोकूळ वाईन शॉपसमोर अतिरेक्यांनी आरडीएक्स असलेली बॅग ठेवली आहे, हॉटेलमधून त्या दिशेने अधूनमधून हॅण्डग्रेनेड फेकून स्फोट घडविण्याचा प्रय} करीत होते, एका नागरिकाने ही बाब तडवींना सांगितल्यानंतर क्षणभराचाही वेळ न दवडता त्यांनी कंट्रोलरूमला त्याबाबत कळविले, त्यांच्या सूचनेनंतर काही मिनिटांत घटनास्थळी बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी आले. त्यांनी तत्परतेने कारवाई करीत बॅग ताब्यात घेतली. अतिरेक्यांच्या हल्ल्यात ऑपरेटर खेतलेच्या कमरेला गोळी लागल्याने तडवींनी त्याला अन्य वाहनातून रुग्णालयात पाठविले, त्याच्याऐवजी दुसरा ऑपरेटर लवकर उपलब्ध होणो शक्य नसल्याने नांगरे-पाटील यांनी खेतलेकडील वॉकीटॉकी त्याला ताब्यात घेण्याची सूचना केली, त्यानुसार ते रात्री 11र्पयत त्यावरून सातत्याने कंट्रोलरूमला माहिती देत राहिले. त्यानंतर रात्री 2 वाजेर्पयत मोटारीतील वायरलेसवरून संपर्क साधून घटनास्थळातील परिस्थिती व अतिरिक्त मदतीबाबत मागणी करीत राहिले होते. कंट्रोलरूमची धुरा सांभाळणा:या तत्कालीन सहआयुक्त राकेश मारिया यांनी नेव्हीच्या वरिष्ठ अधिका:यांशी संपर्क साधल्यानंतर मध्यरात्री जवान दुस:या व तिस:या मजल्यार्पयत गेले. पहाटे राष्ट्रीय सुरक्षा दलाची टीम पोहोचली, 11च्या सुमारास त्यांनी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केल्यानंतर नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील 1क् जणांचे पथक परिसरात थांबून त्यांना माहिती देत होते. दुस:या दिवशी सायं. 7 वा. तडवी यांच्यासाठी ‘रिलिव्हर’ आला.
 
सन्मानापासून वंचित
चालक तडवी यांच्याप्रमाणो आयपीएस सदानंद दाते यांच्याबरोबर कामा हॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांशी सामना करणा:या  पोलीस निरीक्षक विजय पोवार, विजय शिंदे, हवालदार मोहन शिंदे व कॉन्स्टेबल सचिन टिळेकर यांच्याकडे कामगिरीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांना ‘डीजी इनसिगAीया’ दिला असलातरी  शौर्यपदकाबाबतचा प्रस्ताव  विलंब झाल्याचे सांगून  सन्मानापासून वंचित ठेवले आहे.
 
गृहखात्याने नांगरे-पाटील, राजवर्धन यांच्यासह 6 जणांना गेल्या वर्षी 15 ऑगस्टला शौर्यपदक जाहीर केले. मात्र तडवी यांना गौरविण्याची दानत विभागाने दाखविलेली नाही. गेल्या वर्षी ‘एमटी’चे उपायुक्त अतुल पाटील यांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांना तडवींच्या कामाबद्दल अहवाल देऊन महासंचालकांचे सन्मानचिन्ह देण्यासाठी शिफारस करण्याची विनंती केली होती, मात्र या घटनेला खूप अवधी झाल्याचे सांगून प्रस्ताव फेटाळण्यात आला.
 

 

Web Title: 'He' remained unaware of the constable.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.