मागेल त्याला मिळणार पाणी..
By Admin | Published: December 12, 2014 01:06 AM2014-12-12T01:06:19+5:302014-12-12T01:06:19+5:30
पाणीचोरी व गळती रोखणो आवाक्याबाहेर असल्यानंतर सरसकट सर्वाना पाणीपुरवठय़ाचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीच्या विरोधामुळे बारगळला होता़
पालिका प्रशासनाचा प्रस्ताव : सरसकट सर्व झोपडय़ांना पाणीपुरवठा करण्यावर लवकरच निर्णय
मुंबई : पाणीचोरी व गळती रोखणो आवाक्याबाहेर असल्यानंतर सरसकट सर्वाना पाणीपुरवठय़ाचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीच्या विरोधामुळे बारगळला होता़ मात्र उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर शिवसेनेची तलवारही म्यान झाली आह़े ही संधी साधून मागेल त्याला पाणी देण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबिले आह़े येत्या पंधरवडय़ात हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर येणार असल्याचे विश्वासनीय सूत्रंकडून समजत़े
आतार्पयत 1995 र्पयतच्या झोपडय़ांनाच पाणीपुरवठा केला जात होता़ निवडणुकीच्या काळात डेडलाइन वाढल्यानंतर 2क्क्क् र्पयतच्या झोपडय़ांनाही पाणी मिळू लागल़े त्यामुळे सरसकट सर्वानाच पाणी देण्याच्या प्रस्तावाची पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली़ मात्र बेकायदा झोपडीधारक जलजोडणीची बिले हा पुरावा म्हणून वापरतील़ याचे परप्रांतीयांना आमंत्रणच मिळेल, असा युक्तिवाद करीत शिवसेनेने विरोधाचा ङोंडा फडकावला होता़ मात्र 1 जानेवारी 2क्क्क् नंतरच्या झोपडय़ांना पाणी देत नसाल तर त्यांच्यावर कारवाई का नाही करत, असे उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान पालिकेला फटकारल़े त्यानंतर चक्र वेगाने हलत प्रत्येक झोपडीला पाणी देण्याचा प्रस्ताव तयार होऊ
लागला़ (प्रतिनिधी)
शिवसेनेची सावध भूमिका : सरसकट पाणीपुरवठा म्हणजे परप्रांतीयांना मुंबईत आमंत्रणच असल्याचा विरोध शिवसेनेने केला होता़ मात्र न्यायालयाने फटकारल्यानंतर शिवसेना बॅकफूटवर गेली आह़े प्रशासनाच्या सरसकट पाणीपुरवठय़ाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना विचारले असता, प्रस्ताव आल्यानंतर बघू, अशी सावध भूमिका त्यांनी घेतली आह़े
यासाठी सर्वप्रथम मुलुंड आणि वांद्रे या दोन वॉर्डाची निवड करण्यात आली़ या वॉर्डामधील प्रत्येक घरामधील पाण्याच्या वापराचे स्वरूप, पाण्याचे बिल भरण्याची त्यांची क्षमता, पाणीपुरवठा पालिकेमार्फत अथवा खासगी टँकर्सच्या माध्यमातून होत आह़े तसेच वापरण्यात येणा:या पाण्याचा दर्जा तपासण्यात येत आह़े
अनेक झोपडय़ा अरुंद ठिकाणी, डोंगरावर असल्याने तेथे जलवाहिनी जाऊ शकेल का? सर्व झोपडय़ांना पाणीपुरवठा करणो शक्य होईल का? याचा अभ्यास सुरू आह़े त्यामुळे सुरुवातीच्या काळात थोडय़ाच झोपडय़ांर्पयत पाणी पोहोचू शकेल़ ही मोहीम यशस्वी झाल्यास सर्वच झोपडय़ांना पाणी मिळेल, असे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितल़े
मुंबईत पाण्याची दररोजची मागणी 42क्क् दशलक्ष लीटर्स आह़े मध्य वैतरणा प्रकल्पामुळे या वर्षीपासून पाणीपुरवठा वाढून आता दररोज 375क् दशलक्ष लीटर पाणीपुरवठा सुरू झाला़ मात्र झोपडपट्टय़ांमध्ये चोरी व गळतीमुळे सुमारे 3क् टक्के म्हणजेच 9क्क् दशलक्ष लीटर पाणी वाया जात़े सरसकट पाणीपुरवठा केल्यास चोरी थांबेल, असा पालिकेला विश्वास आह़े
दर हजार लीटर पाण्यासाठी झोपडपट्टय़ांना तीन रुपये 24 पैसे दर लावण्यात आलेला आह़े दरवर्षी पाण्याच्या दरामध्ये वाढ होत असल्याने यात आठ टक्के वाढ झाली, तरी हा भार मोठा नसेल़ त्यामुळे पाणी माफियांना जादा पैसे मोजणारे झोपडीधारक पालिकेकडे पाणी बिल भरण्यास पसंती देतील़ यामुळे पालिकेचा महसूलही वाढेल, असा अधिका:यांचा अंदाज आह़े
झोपडपट्टय़ांमध्ये जलवाहिन्या फोडून पाणीचोरी होत़े त्यामुळे फुटलेल्या जलवाहिन्यांमधून गळती व जलवाहिन्यांमध्ये दूषित पाणी शिरण्याचे प्रमाण 3क् टक्क्यांवर पोहोचले होत़े यामुळे गॅस्ट्रोसारख्या आजाराचे प्रमाण वाढले होत़े ते आटोक्यात येईल़
पाणी वितरणाच्या टोकाला राहणा:या नागरिकांना कायम पाण्यासाठी वणवण करावी लागत होती़ झोपडपट्टय़ांमध्ये पाणी मिळाल्यानंतर मध्येच चोरीला जाणारे हे पाणी टोकार्पयतही पोहोचू शकेल, असा अधिका:यांचा दावा आह़े
सरसकट पाण्यासाठी यापूर्वीच तयारी
मुंबईतील 54 टक्के लोकवस्ती झोपडपट्टय़ांमध्ये वास्तव्य करीत आह़े बेकायदा वस्त्यांना अधिकृत जलजोडण्या मिळत नसल्यामुळे अनेक ठिकाणी राजरोस पाणीचोरी सुरू असत़े त्यामुळे वितरण सुधारणा प्रकल्प (डब्ल्यूडीआयपी) अंतर्गतझोपडय़ांचा अभ्यास पालिकेने सुरू केला़
पाणी बिल न मिळालेल्यांना जादा मुदत
मुंबई : कुरिअर कंपनीने पाण्याची बिले न पोहोचविल्याचा नाहक भरुदड नागरिकांना बसणार आह़े त्यामुळे बिल न पाठवताच थकबाकीदारांच्या यादीत टाकलेल्या ग्राहकांना पाणीपट्टी भरण्याची जादा मुदत देऊन या सावळागोंधळ कारभारावर पडदा टाकण्याचे काम पालिका प्रशासन करणार आह़े
पालिकेने कंत्रट दिलेल्या कंपनीने अपु:या मनुष्यबळामुळे बिल पाठविण्याचे काम छोटय़ा कुरिअर कंपनीला दिल़े मात्र या कंपनीच्या कुरिअर बॉईजना झोपडपट्टय़ांमधील पत्ते सापडत नव्हते. त्यामुळे काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी पाण्याची बिलेच नागरिकांर्पयत पोहोचलेली नाहीत़ मात्र चूक कुरिअर कंपनीची असताना या नागरिकांना थकबाकीदारांच्या यादीत टाकण्याचा प्रस्ताप पालिकेने केला आह़े
कुर्ला आणि घाटकोपर विभागात घडलेले हे प्रकार स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले आह़े त्यामुळे पाणीपट्टी भरण्याची मुदत 6क् ते 9क् दिवसांर्पयत वाढविण्यात येणार आह़े तसेच किती ठिकाणी बिल पोहोचलेले नाही, त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर किती परिणाम होणार आहे, याचा शोधही घेण्यात येत आह़े (प्रतिनिधी)
गोंधळ घालणा:या कंपनीला कंत्रट नाही
बिल पोहोचविण्याचे काम घेतल्यानंतर त्यामध्ये गोंधळ घालून पालिका व नागरिकांच्या डोक्याचा ताप वाढविणा:या कुरिअर कंपनीचे कंत्रट मार्चमध्ये संपुष्टात येत आह़े त्यामुळे या कंपनीला पुढच्या वर्षीचे कंत्रट न देण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आह़े
ई-मेल दिल्यास
बिल त्वरित
या गोंधळाचा त्रस ग्राहकांना झाला़ यामुळे ई-मेलद्वारेही बिल पाठविण्याची तयारी पालिकेने दर्शविली आह़े 4क् हजार ग्राहकांचे ई-मेल पालिकेकडे आहेत़ सर्वच ग्राहकांनी आपला ई-मेल आयडी विभाग कार्यालय, नागरी सुविधा केंद्राकडे दिल्यास त्वरित बिल पाठविण्याची सोय करण्यात येईल, असे आवाहन पालिकेने केले आह़े