- स्नेहा मोरेमुंबई : पनवेल येथे राहणाऱ्या प्रशांत तांदळेकर या (२७) वर्षीय तरुणाला वयाच्या १६व्या वर्षी अॅन्कीलॉझिंग स्पाँडिलायटीस या शारीरिक दुखण्याने ग्रासले होते. त्यानंतर, ११ वर्षे अंथरुणाला खिळून असणारा प्रशांत आता आपल्या पायांवर उभा राहण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रशांतने पालकांच्या मदतीने मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमधील वेगवेगळ्या डॉक्टरांचे उंबरठे झिजविले. मात्र, तात्पुरते औषध देण्यात आले. अखेर इतक्या वर्षांनंतर राज्य शासनाच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात आॅर्थोपेडिक विभागात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.गेल्या काही महिन्यांपासून प्रशांतवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १० डिसेंबर रोजी सोमवारी प्रशांतवर सेंट जॉर्ज रुग्णालयात आॅर्थोपेडिक विभाग प्रमुख डॉ. नादिर शाह यांच्या चमूने कंबरेजवळील सांधे प्रत्यारोपणाची दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण केली. यापूर्वी आॅक्टोबरमध्ये प्रशांतच्या एका बाजूच्या कंबरेच्या सांध्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. आता त्याची प्रकृती सुधारत असून, दीड महिन्यांत तो स्वत:च्या पायावर उभा राहून चालू लागेल, अशी माहिती डॉ. शाह यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.डॉ. शाह यांनी सांगितले की, हजार रुग्णांमध्ये २० ते ४० वयोगटांतील एखाद्या तरुणात अशी समस्या आढळते. हा आजार नसून शारीरिक अवस्था आहे. या अवस्थेत कंबरेकडील सांध्यामध्ये वाकण्यासाठी आवश्यक असणाºया हाडांमध्ये जन्मत: समस्या असल्याचे दिसून येते. मात्र, काही वेळा ठरावीक वयोगटानंतर त्याचे दुष्परिणाम आढळून येतात. यावर योग्य वेळी उपचार करणे गरजेचे आहे. बºयाचदा या अवस्थेला अनुवंशिकता कारणीभूत असते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यास आयुष्यभर तो रुग्ण चालू-फिरू शकत नाही.पुन्हा देणार दहावीची परीक्षादहावीत परीक्षेची तयारी करत असताना, अवघ्या १६व्या वर्षी या शारीरिक अवस्थेचे निदान झाले. परिणामी, शरीराची संपूर्ण हालचाल थांबल्यामुळे शिक्षण, करियर ही सगळीच स्वप्ने अपूर्ण राहिली. मात्र, अजूनही जिद्द सोडली नाही. नव्या आत्मविश्वासाने पुन्हा दहावीची परीक्षा देण्याचा निश्चय केला आहे. त्यानंतर, शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभा राहणार आहे.- प्रशांत तांदळेकर‘त्या’ रुग्णावर मोफत उपचारप्रशांतच्या कंबरेकडील सांध्यावर प्रत्यारोपणाच्या दोन शस्त्रक्रिया केल्या. त्यासाठी लाखोंच्या घरात खर्च येतो. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून मोफत उपचार करण्यात आले. अशा पद्धतीची आॅर्थोपेडिक विभागातील ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.- डॉ. मधुकर गायकवाड, सेंट जॉर्ज रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक
‘तो’ ११ वर्षांनंतर राहणार स्वत:च्या पायावर उभा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 5:55 AM