Uddhav Thackeray: राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला पाठींबा देणार?; पत्रकारांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 02:41 PM2022-07-08T14:41:01+5:302022-07-08T14:43:23+5:30

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या दोन खासदारांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या पत्राबाबत आज पत्रकारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारले.

He will take a decision after talking to Shiv Sena MPs about the presidential election, said former CM Uddhav Thackeray. | Uddhav Thackeray: राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला पाठींबा देणार?; पत्रकारांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Uddhav Thackeray: राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला पाठींबा देणार?; पत्रकारांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Next

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी नको म्हणत भाजपासोबत जाण्यासाठी बंड पुकारल्याची घटना ताजीच असताना आता राष्ट्रपती निवडणुकीवरून शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावीत यांनी भाजपाच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. तसे पत्रच त्यांनी थेट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना पाठविल्याने राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

 माशाचे अश्रू दिसत नाहीत; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं मनातलं दुःख

शिवसेनेच्या या दोन खासदारांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या पत्राबाबत आज पत्रकारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारले. यावर मी पक्षातील सर्व खासदारांसोबत बोलून राष्ट्रपती निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद देत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जूनला दिल्लीत आयोजित केलेल्या बैठकीला शिवसेनेचे नेते सुभाष देसाई व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर स्थिती बदलली आहे. शिवसेनेचे विधानसभेत ५५ सदस्य आहेत. त्यापैकी ४० जण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळे झाले आहेत. यामुळे या आमदारांची मते यशवंत सिन्हा यांना मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

पंढरपूरला येण्यासाठी वारकऱ्यांची विनंती, आषाढीला जाणार? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

दरम्यान, लोकसभेत शिवसेनेचे १९ खासदार व राज्यसभेत ३ खासदार आहेत. या २२ खासदारांचे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एकूण मूल्य १५ हजार ४०० एवढे आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील आमदारांच्या मतांचे मूल्य १७५ एवढे निश्चित केले आहे. यामुळे शिवसेनेकडे असलेल्या एकूण ५५ आमदारांचे मूल्य ९,६२५ एवढे आहे. शिवसेनेच्या बंडखोर ४० आमदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्यास शिवसेनेकडून सिन्हा यांना १५ आमदारांकडून केवळ २,६२५ मूल्यांची मते मिळू शकतील. 

Read in English

Web Title: He will take a decision after talking to Shiv Sena MPs about the presidential election, said former CM Uddhav Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.