Join us
Daily Top 2Weekly Top 5

हाफ राईससाठी डोके फोडले, गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Updated: August 18, 2023 15:35 IST

बनिया यांनी विलेपार्ले पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

मुंबई : विलेपार्ले परिसरात राकेश बनिया (३२) हे श्रद्धानंद रोडवर चायनीजचा स्टॉल चालवतात. त्यांच्या दुकानात १६ ऑगस्ट रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास त्यांच्या ओळखीचा चिराग सोलंकी हा इसम आला. त्याने बनिया यांना दोन हाफ राईसची ऑर्डर दिली. त्यावर बनिया यांनी पैशाची मागणी केली. तेव्हा पैसे नंतर देणार असे सोलंकीने सांगितले. मात्र पैसे असतील तरच ऑर्डर मिळणार असे उत्तर बनिया यांनी दिल्यावर या दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि सोलंकीने त्यांना मारहाण सुरू केली. तसेच हातातील कडा डोक्यावर आदळल्याने त्यांना दुखापत झाली आणि रक्तस्राव होऊ लागला.

बनिया यांच्या वडिलांनी त्यांना व्ही एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी नेले आणि त्यादरम्यान सोलंकी हा स्टॉलवर गेला व त्यावर एक बाटली फेकून मारली. तसेच तुझ्या दुकानातून फुड डिलिव्हरीसाठी कोणी आले तर त्यालाही मारहाण करण्याची धमकी सोलंकीने दिली. या विरोधात बनिया यांनी विलेपार्ले पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई