अकरावी प्रवेशाची मुदत वाढविण्याची मुख्याध्यापकांची मागणी

By Admin | Published: June 24, 2014 01:14 AM2014-06-24T01:14:26+5:302014-06-24T01:14:26+5:30

दहावी परीक्षेच्या निकालात अनेक विद्याथ्र्याचे निकाल रोखण्यात आले होते. विद्याथ्र्याना निकाल विलंबाने मिळाल्याने अनेकांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरता आलेला नाही.

Headmaster's demand for extension of the eleventh entrance | अकरावी प्रवेशाची मुदत वाढविण्याची मुख्याध्यापकांची मागणी

अकरावी प्रवेशाची मुदत वाढविण्याची मुख्याध्यापकांची मागणी

googlenewsNext
>मुंबई : दहावी परीक्षेच्या निकालात अनेक विद्याथ्र्याचे निकाल रोखण्यात आले होते. विद्याथ्र्याना निकाल विलंबाने मिळाल्याने अनेकांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरता आलेला नाही. तसेच विद्याथ्र्याना मूळ गुणपत्रिका 26 जून रोजी मिळणार असल्याने अर्जातील चुका टाळण्यासाठी अकरावी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत तीन दिवसांनी वाढविण्यात यावी, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटनेने उपशिक्षणाधिकारी यांना पत्रद्वारे केली आहे.
अनेक शाळांनी विद्याथ्र्याचे गुण विहित मुदतीत न पाठवल्याने शिक्षण मंडळाने दहावीच्या काही विद्याथ्र्याचे निकाल रोखले होते. यानंतर मंडळाने विद्याथ्र्याना निकाल दिले असले तरी याची नोंद अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया पार पडणा:या एमकेसीएलकडे पूर्णपणो झालेली नाही. अनेक विद्याथ्र्यानी अद्याप अर्ज न भरल्याने अकरावी प्रवेशाची मुदत तीन दिवसांनी वाढवावी, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटनेने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले. दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी विद्याथ्र्याना 25 जूनर्पयत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Headmaster's demand for extension of the eleventh entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.