पर्यटन संचालनालयाच्या मुख्यालयाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:07 AM2021-03-10T04:07:48+5:302021-03-10T04:07:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पर्यटन संचालनालयाच्या मुख्यालयाचे नरिमन भवन येथे स्थानांतर करण्यात आले आहे. पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पर्यटन संचालनालयाच्या मुख्यालयाचे नरिमन भवन येथे स्थानांतर करण्यात आले आहे. पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते मंगळवारी या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले.
२०१९ पासून महाराष्ट्र पर्यटन संचालनालय हे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे प्रमुख कार्यालय होते. महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय (डीओटी) आणि एमटीडीसी (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलमेंट कॉर्पोरेशन) ह्या दोन्ही संस्थांची कार्यालये एका इमारतीत होती. कर्मचाऱ्यांची संख्या आणि विभागाच्या कामाचा पसारा वाढल्याने नव्या कार्यालयाचा शोध सुरू होता. आता नरिमन भवन इमारतीच्या १५ व्या मजल्यावर मुख्यालयाचे स्थानांतर करण्यात आल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
या वेळी पर्यटन, उत्पादन शुल्क आणि नागरी विमान वाहतूक विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर आणि पर्यटन खात्याचे संचालक डॉ. धनंजय सावलकर उपस्थित होते.