Health: राज्यातील मधुमेहींच्या संख्येत चिंताजनक वाढ, २०१९ मध्ये उपचाराधीन रुग्ण होते १५ हजार, आता दोन लाखांहून अधिक

By स्नेहा मोरे | Published: November 14, 2022 12:21 PM2022-11-14T12:21:46+5:302022-11-14T12:25:58+5:30

Diabetics : राज्यात कोरोनापूर्व-पश्चात काळात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या आजारांच्या वाढीला बदलत्या जीवनशैलीसह अन्य कारणे असल्याचे निरीक्षण वैद्यकीयतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

Health: An alarming rise in the number of diabetics in the state | Health: राज्यातील मधुमेहींच्या संख्येत चिंताजनक वाढ, २०१९ मध्ये उपचाराधीन रुग्ण होते १५ हजार, आता दोन लाखांहून अधिक

Health: राज्यातील मधुमेहींच्या संख्येत चिंताजनक वाढ, २०१९ मध्ये उपचाराधीन रुग्ण होते १५ हजार, आता दोन लाखांहून अधिक

Next

- स्नेहा मोरे
मुंबई : राज्यात कोरोनापूर्व-पश्चात काळात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या आजारांच्या वाढीला बदलत्या जीवनशैलीसह अन्य कारणे असल्याचे निरीक्षण वैद्यकीयतज्ज्ञांनी नोंदविले आहे. राज्यात मधुमेहींची संख्या चिंताजनक असल्याचे जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने स्पष्ट 
झाले आहे. 
इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या मते, २०१९ सालापर्यंत देशात मधुमेह असलेल्या रुग्णांची संख्या ७० दशलक्ष होती आणि ती झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हा असाध्य आजार आहे, परंतु आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जीवनशैली बदलून या आजारावर नियंत्रण मिळवू शकतात. बहुतेक लोकांना उच्च मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल माहिती नसते आणि ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. न्यूमोनिया, डेंग्यू यासारख्या आजारांमुळे अनेक वेळा रक्तातील साखरेची पातळी वाढते, परंतु जर तुम्हाला अशी कोणतीही समस्या भेडसावत नसेल आणि रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल तर ही धोकादायक बाब आहे, असे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. तन्वी शेणवी यांनी मांडले आहे. 

मुंबईकरांच्या रक्तातील साखरही वाढली
पालिकेने घरोघरी राबविलेल्या सर्वेक्षणातून ११ टक्के मुंबईकरांच्या रक्तातील साखरेतही वाढ झाल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षणात तीस वर्षांपेक्षा अधिक वयाच्या १ लाख ३ हजार ४२० महिलांची तपासणी केली आहे, त्यातील ७ हजार ४७५ महिलांना मधुमेह झाल्याचे निदान झाले आहे.

पीसीओएस असलेल्या महिलांना वाढता धोका
अलीकडल्या काळात जीवनशैलीत बिघाड झाला आहे. लहान मुली आणि महिलांना अनियमित मासिक पाळीच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. 
मासिक पाळी अनियमित होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम होय. आजच्या काळात दहापैकी एका मुलीमध्ये पीसीओएस हा आजार असतो, अशी नोंद आहे. पीसीओएस हा संप्रेरकांशी निगडित विकार आहे. 
मासिक पाळीशी संबंधित असलेल्या काही संप्रेरकांचे शरीरात असंतुलन झाल्याने हा विकार होतो. ही एक मधुमेहापूर्वीची अवस्था आहे. म्हणजे ज्या महिलांना पीसीओएस विकार आहे, त्यांना पुढं मधुमेहाचा धोका संभवतो.

पुणे आघाडीवर 
    राज्यात पुणे जिल्ह्यात मधुमेही रुग्णांच्या निदानाचे प्रमाण अधिक आहे. 
    पुण्यात रुग्ण निदानाचा दर 
तब्बल ६३ टक्के आहे.
    तर चंद्रपूर, नागपूर येथे अनुक्रमे २१ आणि १८ इतका आहे. 
    तिशीतच मधुमेहाचे निदान होणाऱ्या महिलांमध्ये वाढ होत असल्याचे तपासणीतून समोर आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 
    बदलती जीवनशैली, आहार, ताण तणावाचे व्यवस्थापन याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज मधुमेहतज्ज्ञ डॉ. निरंजन राणावत यांनी व्यक्त केली.

 वर्ष    रुग्ण         उपचाराधीन
२०१९ -२०    १५,९२५        १५,५१०
२०२०-२१     १४११२८     १३९२८५ 
२०२१-२२     १४५१६२     १४२८९७ 
नोव्हें., २०२२    २४३३१८     २४०२४९ 
एकूण    ५,४५,५३३       ५,३७,९४१

Web Title: Health: An alarming rise in the number of diabetics in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.