विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता हेच प्राधान्य : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:38+5:302021-06-02T04:06:38+5:30
विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता हेच प्राधान्य : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आणि ...
विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता हेच प्राधान्य : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आणि परीक्षेच्या संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता परीक्षेऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा तसेच केंद्र सरकारने देश पातळीवर या संदर्भात एकसूत्र धोरण निश्चित करावे ही मागणी महाराष्ट्र शासनाने केली होती. या मागण्यांचा विचार करता केंद्र सरकारने सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह आहे. मुलाच्या शैक्षणिक जीवनातील बारावी परीक्षा ही महत्त्वाची पायरी असली तरीही सद्यपरिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. या पुढे महाराष्ट्र शासन ही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबतही विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जोपासून लवकरच निर्णय घेईल.