Join us

आयुर्वेदाच्या प्रसारासाठी आरोग्यवर्धिनी सेवा केंद्रे सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 1:21 AM

आयुर्वेद ही भारताची जुनी ओळख आहे. प्परंतु आताच्या पिढीमध्ये आयुर्वेदाचा अभ्यास मागे पडत गेला

मुंबई :आयुर्वेद ही देशाची प्राचीन परंपरा आहे. आजही अनेक वैद्यांनी ही परंपरा जोपासली आहे. महाराष्ट्र शासनसुद्धा आयुर्वेदाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम राबवित आहे. आयुर्वेदाच्या विशेष प्रसारासाठी ‘आरोग्यवर्धिनी’ या नावाने सेवा देणारी केंद्रे राज्य सरकारकडून सुरू होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयुषच्या हॉस्पिटलची स्थापना करण्याचा सरकारचा संकल्प आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या आयुष विभागाचे व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे साहाय्यक संचालक सुभाष घोलप यांनी केले. ते साण्डू ब्रदर्सनी धन्वंतरी जयंतीनिमित्त चेंबूर येथे आयोजित केलेल्या श्री धन्वंतरी पूजन आणि वैद्य सत्कार समारोह कार्यक्रमात बोलत होते.

धन्वंतरी जयंतीनिमित्त आयुर्वेदाच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या वैद्य अशोक माने, कुशल केळशीकर, नीरज कामथे, अश्विनी मुळ्ये, नीलिमा शिसोदे, सुजित ठाकूर आणि रसेश संपत या सात ज्येष्ठ वैद्यांचा सत्कार घोलप यांच्या हस्ते चेंबूर येथे करण्यात आला. साण्डू ब्रदर्सचे संचालक शशांक साण्डू म्हणाले, आयुर्वेद ही भारताची जुनी ओळख आहे. प्परंतु आताच्या पिढीमध्ये आयुर्वेदाचा अभ्यास मागे पडत गेला. तरीही काही वैद्यांनी हे शास्त्र जपून ठेवले़