स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची होतेय हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 04:36 AM2020-08-12T04:36:34+5:302020-08-12T04:36:40+5:30

सामाजिक कार्यकर्त्यांचे टीकास्त्र; मुंबई महापालिकेच्या उपाययोजना अपुऱ्या

The health of the cemetery staff is being taken care of | स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची होतेय हेळसांड

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची होतेय हेळसांड

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना नियंत्रणात येत असल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून केला जात असला तरी कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अद्यापही घटलेले नाही. अशा वेळी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांसह इतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना स्मशानभूमी अपºया पडू नयेत म्हणून मुंबई महापालिका उपाययोजना करत आहे.

एकंदर मुंबई शहर आणि उपनगरातील २१० स्मशानभूमींमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. विशेषत: कोरोनाच्या संकटात स्मशानभूमीमधील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे, असा दावा पालिकेने केला आहे. मात्र स्मशानभूमीतील कर्मचाºयांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याचा आरोप केला जात आहे.

मुंबईत ४९ हिंदू स्मशानभूमी, २० मुस्लीम दफनभूमी, १२ ख्रिश्चन दफनभूमी आहेत. खासगी २० हिंदू स्मशानभूमी, ५० मुस्लीम दफनभूमी, ३८ ख्रिश्चन दफनभूमी आणि ७ इतर धर्मीयांच्या स्मशानभूमी आहेत. यासोबत १० विद्युतदाहिनी आणि चार स्मशानभूमी आहेत. चंदनवाडी, वैकुंठधाम, भोईवाडा, हेन्स रोड, शिवाजी पार्क, जोगेश्वरी येथील ओशिवरा, डहाणूकरवाडी, दौलतनगर, चरई, विक्रोळी येथील टागोरनगर या १० ठिकाणी विद्युतदाहिनी आहेत. याव्यतिरिक्त गॅसदाहिनीची सुविधा ४ स्मशानभूमींमध्ये सुरू करण्यात आली आहे. दौलतनगर स्मशानभूमी, चरई स्मशानभूमी, सायन स्मशानभूमीचा समावेश असून, उर्वरित ९ स्मशानभूमींमध्ये टप्प्याटप्प्याने ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

पारशी वाड्यातल्या विद्युत दाहिनीची मध्यंतरी तक्रार केली होती. दिड कोटी लोकसंख्येसाठी किती स्मशानभूमी लागतील? याचा विचार विकास आराखड्यातकेला पाहिजे. ख्रिश्चन समाजात प्रत्येक चर्चला लागू सुदैवाने दफनभूमी आहे. मात्र काही चर्च नवे झाले आहेत. त्यांच्याकडे दफनभूमी नाही. उदाहरणार्थ जर एखादा दहिसरला कोणाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कारासाठी शिवडीला घेऊन जावे लागते. त्यामुळे गरज म्हणून याचा विचार केला पाहिजे.
- गॉडफ्रे पिमेंटा, संस्थापक-अध्यक्ष, वॉचडॉग फाउंडेशन

कुर्ला पश्चिमेकडील सोनापूर गल्ली येथील मीनाताई बाळासाहेब ठाकरे हिंदू स्मशानभूमीमधील कामे हाती घेण्यात आली आहेत. मृत्यू नोंदणी कार्यालय - दुरुस्तीकरण, पर्जन्य जलवाहिनी - दुरुस्तीकरण, अस्थीरूम शेजारील - पॅसेज, पिण्याच्या पाण्याची टाकी - दुरुस्तीकरण; या कामांचा यात समावेश आहे.
- संजय तुर्डे, नगरसेवक

प्रश्न कोणत्या समाजासाठी किती स्मशाभूमी आहेत हा नाही, तर कोणत्याच स्मशानभूमीवर ताण येऊ नये हा आहे. महापालिकेने सर्वधर्मीय स्मशानभूमीसाठी सुविधा केली पाहिजे. एखाद्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू होत असेल तर त्याला किमान ‘कफन’ तरी मिळावे. कायद्यानुसार तरी किमान विधी करता आल्या पाहिजेत.
- अजीज अमरेलीवाला,
सामाजिक कार्यकर्ते, मरोळ, अंधेरी

हिंदू स्मशानभूमीत अडचणी येत नाहीत. मात्र इतर धर्मीयांबाबत अडचणी येऊ शकतात. विशेषत: जेथे दफनविधी केला जातो तिथे जमीन उपलब्ध असणे आवश्यक आहे. अशा वेळी महापालिकेने सेवासुविधा देणे आवश्यक आहे. सुरुवातीला या अडचणी आल्याही असतील. मात्र हे प्रमाण आता कमी होत आहे.
- विनोद घोलप, सामाजिक कार्यकर्ते, मालाड

चेंबूर येथे दोन विद्युतदाहिन्या आहेत. यातील एक बंद आहे. येथील कर्मचाºयांना पुरेशा सेवासुविधा सुरुवातीला मिळत नव्हत्या. आम्ही तक्रार केल्यानंतर आरोग्याच्या काही सेवासुविधा मिळाल्या. मात्र अद्यापही या सुविधा तोकड्या आहेत. पीपीइ किट देणे. स्वच्छता ठेवणे. सॅनिटाइज करणे. आदींबाबत महापालिकेने स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- सुभाष मराठे निमगावकर, सामाजिक कार्यकर्ते, चेंबूर

Web Title: The health of the cemetery staff is being taken care of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.