लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अपघातातील कारणांमध्ये वाहनचालक शारीरिकदृष्ट्या फिट नसणे हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे वाहनचालकांची लवकरच आरोग्य तपासणी करण्यात येईल, असे परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले. ते रस्ते सुरक्षा अभियाननिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
परब म्हणाले, ‘सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ हे यावर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य असून, हे अभियान यावेळी पहिल्यांदाच १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत महिनाभरासाठी सुरू राहणार आहे. कोरोनासारख्या महामारीवर आपण अथक प्रयत्नातून, नियमांचे पालन करत आणि परस्परांच्या सहकार्याने नियंत्रण मिळवू शकलो. तसेच प्रयत्न अपघात कमी करण्यासाठीही केले पाहिजेत. वाहनचालकांना धडा शिकविण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी प्रबोधनासोबत कारवाईही आवश्यक आहे. कारवाईला गती देण्यासाठी सरकारकडे ७५ इंटरसेप्टर वाहनांची मागणी केल्याचेही परब यांनी सांगितले.
...............