प्रशासनाचा आरोग्यावरचा खर्च दोन वर्षांत वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:57 AM2019-09-26T00:57:22+5:302019-09-26T00:57:42+5:30

प्रजा संस्थेचा अहवाल

The health expenditure of the administration increased in two years | प्रशासनाचा आरोग्यावरचा खर्च दोन वर्षांत वाढला

प्रशासनाचा आरोग्यावरचा खर्च दोन वर्षांत वाढला

Next

मुंबई: पालिका प्रशासनाने गेल्या दोन वर्षांत आरोग्यसेवा क्षेत्रावर अधिक खर्च केल्याचे निरीक्षण प्रजा संस्थेने अहवालात नोंदविले आहे. पालिका प्रशासनाच्या आरोग्यसेवा क्षेत्राचा एकूण निधी कमी झाला असून तुलनेत रुग्णालय अद्ययावतीकरण, औषधे व उपकरणे, मनुष्यबळ आणि पालिका दवाखान्यांची डागडुजी यावर अधिक खर्च करण्यात आलेला आहे.

प्रजा संस्थेच्या अहवालानुसार, २०१६-१७ साली पालिकेची २ हजार ३८३ कोटी अशी अर्थसंकल्पाची तरतूद होती, त्यापैकी आरोग्यसेवा क्षेत्रावर ७८ टक्के निधी वापरण्यात आला. तर २०१७-१८ साली २ कोटी ५९३ इतक्या निधीची तरतूद होती, त्यातील ८८ टक्के निधी आरोग्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती अहवालात नमूद आहे. मात्र पालिकेच्या दवाखान्यांच्या अद्ययावतीकरण आणि नूतनीकरणासाठी अत्यल्प निधी वापरण्यात आल्याचे निरीक्षण अहवालात मांडले आहे. याविषयी, प्रजा संस्थेचे मिलिंद म्हस्के यांनी सांगितले की, पालिका प्रशासनाने प्राथमिक आरोग्यसेवा क्षेत्राच्या सेवांचा दर्जा उंचावला पाहिजे. जेणेकरून तळागाळातील समाज घटकांना तेथे सेवा मिळू शकेल. आरोग्यसेवांच्या विस्तारासाठी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत, त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास केला पाहिजे.

Web Title: The health expenditure of the administration increased in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.