आजार रोखण्यासाठी आरोग्य भरारी पथके

By admin | Published: June 19, 2014 12:58 AM2014-06-19T00:58:54+5:302014-06-19T00:58:54+5:30

घाण, कचरा, मच्छर, दूषित पाणी आदी विविध कारणांमुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात आरोग्य अधिकाऱ्यांची भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.

Health fighters to prevent illness | आजार रोखण्यासाठी आरोग्य भरारी पथके

आजार रोखण्यासाठी आरोग्य भरारी पथके

Next

वरपगांव : घाण, कचरा, मच्छर, दूषित पाणी आदी विविध कारणांमुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात आरोग्य अधिकाऱ्यांची भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
कल्याण तालुक्यात गोवेली येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय आहे. चार प्राथमिक आरोग्य केंदे्र आणि २५ उपकेंद्रांच्या माध्यमातून १०२ गावे, ४९ पाड्यातील सुमारे अडीज ते तीन लाख नागरिकांसाठी याच केंद्रातून उपचार केले जातात.
पावसाळ्यात मलेरिया, हिवताप, टायफॉइड, गॅस्ट्रो, कावीळ, कॉलरा, अतिसार यासारखे आजार उद्भवतात. कचरा, दूषित पाणी, उघड्यावरचे पदार्थ आदी कारणामुळे या साथीचे प्रमाण वाढते. काही वर्षापूर्वी जिल्ह्णात पहिला कॉलराचा रुग्ण म्हारळ गावात सापडला होता. त्यामुळे यावेळी आपत्ती व्यवस्थापन समितीने मोठी खबरदारी घेतली असून तालुक्यात पाच ठिकाणी साथ नियंत्रण व नैसर्गिक आपत्ती भरारी पथकांची नेमणूक केली आहे. निळजे, आजदे, दहागाव, खडावली येथे पथके कार्यरत राहणार असून निळजे पथकात ५ अधिकारी कर्मचारी ११ गावे, खडावली ५ अधिकारी २८ गावे, दहागाव ६ कर्मचारी २५ ग्रामपंचायती आणि ४० गावे, आजदे ६ कर्मचारी ३५ गावे या शिवाय या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायत समितीच्या मुख्यालयात एक तालुका आरोग्य अधिकारी, एक विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक आणि शिपाई आणि ७ कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आले आहेत.
यातील सर्वाधिक लोकसंख्या व गावे दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येत असून याच परिसरात साथींच्या आजारांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आता भरारी पथकामुळे पावसाळ्यातील साथींच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यात आरोग्य विभागाला यश येईल असे म्हणायला काय हरकत आहे. (वार्ताहर)

Web Title: Health fighters to prevent illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.