Join us  

घामाच्या धारांमुळे आरोग्य धोक्यात

By admin | Published: May 23, 2016 3:29 AM

मे महिन्यात तापमानाचा पारा ३४ ते ३५ अंशांचा खाली उतरलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांची लाहीलाही होत आहे. दुपारच्या उन्हात फिरताना मुंबईकर घामाघूम होत आहेत.

मुंबई : मे महिन्यात तापमानाचा पारा ३४ ते ३५ अंशांचा खाली उतरलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांची लाहीलाही होत आहे. दुपारच्या उन्हात फिरताना मुंबईकर घामाघूम होत आहेत. त्यामुळे डिहायड्रेशन, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रास मुंबईकरांना होत आहेत. सायंकाळी आणि रात्रीदेखील हवा गरम असते. त्यामुळे यंदाचा उकाडा मुंबईकरांना त्रासदायक ठरत आहे. ताप, घसादुखी, पोटदुखीचा त्रास होणारे रुग्ण वाढल्याचे डॉ. वरदा वाटवे यांनी सांगितले. दुपारी उन्हात फिरताना डोके झाकून घेणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून थोड्या-थोड्या वेळाने पाणी पिणे आवश्यक आहे. लिंबू, साखरपाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढते. उन्हाळ्यात थंड पेय, आइसक्रीम, बर्फाचा गोळा अशा पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढते. या पदार्थांमुळे तात्पुरते बरे वाटते; पण, याचा दुष्परिणाम आरोग्यावर होतो. अतिथंड पदार्थ खाल्यामुळे घसा बसणे, खोकला होणे असेही त्रास होत आहेत. दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटदुखी, पोट बिघडण्याच्या तक्रारी वाढत आहेत. तहान जास्त लागली असली तरीही पाणी पिताना काळजी घ्यायला हवी. घरातले स्वच्छ पाणी प्यावे, असा सल्ला डॉ. वाटवे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)