Join us

कोरोनासाठीच्या आरोग्य विमा पॉलिसींची मुदत वाढणार- आयआरडीएआय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 4:28 AM

कोरोना रुग्णांवरील उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आयआरडीएआयने जुलैमध्ये विमा कंपन्यांना विशेष पॉलिसी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कोरोना कवच व कोरोना रक्षक या दोन पॉलिसी दाखल झाल्या.

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि उपचार खर्चाच्या भीतिपोटी आरोग्य विमा काढण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता, इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडियाने (आयआरडीएआय) कोरोना कवच, कोरोना रक्षक या दोन विशेष आरोग्य विमा पॉलिसींसाठी दिलेली मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोना रुग्णांवरील उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आयआरडीएआयने जुलैमध्ये विमा कंपन्यांना विशेष पॉलिसी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कोरोना कवच व कोरोना रक्षक या दोन पॉलिसी दाखल झाल्या. सध्या साडेतीन महिने, साडेसहा आणि साडेनऊ महिन्यांसाठी या पॉलिसी दिल्या जातात. मागील दोन महिन्यांत सुमारे १५ लाख लोकांनी त्या काढल्या असून, गेल्या काही दिवसांत पॉलिसी काढण्याचे प्रमाण सरासरी एक लाखांवर गेले.पॉलिसी तयार करताना मार्च, २०२१ पर्यंत कोरोना संसर्ग कमी होईल असा अंदाज होता. मात्र, रुग्ण वाढत असल्याने साडेनऊ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी, व ३१ मार्चनंतरही त्या उपलब्ध करण्याचा निर्णय आयआरडीएआय घेतला. या पॉलिसींच्या माध्यमातून ५० हजार ते पाच लाखांपर्यंतचे विमा कवच मिळते. त्यासाठी ३०० ते साडेचार हजार रुपयांपर्यंतचा प्रीमियम आहे.

टॅग्स :आरोग्यमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस