Join us

तुकाराम मुंढे यांच्यावर राजकीय दबाव होता का? मंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्टचं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 3:09 PM

काल रात्री राज्यातील सहा आयएएस  अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात आयएएस तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यातच बदली झाली.

काल रात्री राज्यातील सहा आयएएस  अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात आयएएस तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यातच बदली झाली. त्यामुळे राजकीय दबावामुळे ही बदली झाल्याच्या  चर्चा सुरू झाल्या. यावर आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

'तुकाराम मुंढे यांची बदली राजकीय दबावामुळे झालेली नाही. त्यांची बदली झाल्याची बातमी मी माध्यमात पाहिली. त्यांनी काल सायंकाळी गोवर संदर्भात मिटींगही घेतली आहे. ही बदली प्रशासकीय बाबीचा भाग आहे. माझ्या आणि तुकाराम मुंढे यांच्यात कोणताही तणाव नव्हता, ते एक सक्षम अधिकारी आहेत, त्यांच्याकडे आम्ही टास्क देत होतो, त्यामुळे त्यांची बदली का झाली मला माहित नाही, असंही मंत्री तानाजी सावंत म्हणाले.  

१६ वर्षांत १५ पेक्षा अधिक बदल्या, आता २ महिन्यांत पुन्हा एकदा तुकाराम मुंढेंची बदली

"राज्यात गोवरची साथ सुरू आहे, यावर राज्य सरकार सतर्क झाले आहे. ८०० पेक्षा अधिक टीम तयार करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने ५ महिने ते ८ महिन्यात डोस देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री सावंत यांनी दिली. 

२ महिन्यांत पुन्हा एकदा तुकाराम मुंढेंची बदली  

मंगळवारी सरकारनं राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात तुकाराम मुंढे हे आरोग्य आयुक्तपदी रुजू झाले होते.

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली असली तरी त्यांच्याकडे कोणत्याही खात्याचा पदभार अद्याप देण्यात आलेला नाही. दरम्यान, १६ वर्षांच्या सेवेमध्ये तुकाराम मुंढे यांची १५ पेक्षा अधिक वेळा बदली झाली आहे.

  • याअधिकाऱ्यांच्याबदल्या
  • भाग्यश्री बानाईत, मु.का.अ. शिर्डी संस्थान यांची बदली सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर या पदावर.
  • व्ही एन सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त एम एम आर डी ए यांची बदली आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पदावर.
  • सौम्या शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी नांदेड यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर.
  • एस एम कुर्ती कोटी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर.
  • एस एस चव्हाण यांची नियुक्ती आयुक्त कृषी या पदावर.
  • तुकाराम मुंढे, आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची बदली - नियुक्ती प्रतीक्षाधिन.
टॅग्स :तुकाराम मुंढेतानाजी सावंत