आरोग्य अधिकाऱ्यांची भरती निवड मंडळामार्फत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 11:38 PM2018-09-18T23:38:35+5:302018-09-18T23:38:57+5:30
एमपीएससीतून वगळले; अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेसाठी तोडगा
मुंबई : राज्यात आरोग्य अधिकारी लवकर उपलब्ध व्हावेत यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व विशेषज्ञ संवर्गातील १७ विविध पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्यात आली आहेत. पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी ही पदे स्वतंत्र निवड मंडळाद्वारे भरण्यात येणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी हा निर्णय घेतला. तीन वर्षांनंतर ही पदे पूर्ववत आयोगाच्या कार्यकक्षेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. या पदांच्या निवडीसाठी स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ज्या पदांच्या भरती प्रक्रिया सुरू असतील ती पदे वगळून उर्वरित पदे नवीन मंडळामार्फत भरण्यात येणार आहेत.
कोराडी तलावाचे संवर्धन
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून जलपरिसंस्थेच्या संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी राबविण्यात येणाºया राष्ट्रीय योजनेंतर्गत नागपूर जवळील महानिर्मितीच्या (महाजेनको) कोराडी तलावाचे संवर्धन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
शहरी व निमशहरी भागातील तलावांच्या संवर्धनासह प्रदूषित तलावांचे व्यवस्थापन करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. त्यासाठीचा ६० टक्के खर्च केंद्र सरकार तर ४० टक्के खर्च महानिर्मितीकडून केला जाईल. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील हा तलाव आहे.
व्यापाºयांकडून अनामत नाही
व्यापार सुलभता धोरणांतर्गत महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियमानुसार नुसार ऐच्छिक नोंदणी करणाºया व्यापाºयांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द करण्यासाठी अधिनियमामध्ये तांत्रिक सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.आजच्या निर्णयानुसार व्यापाºयाने नोंदणी दाखला प्राप्त झाल्यानंतर विहित मुदतीत स्वत:च्या चालू बँक खात्याचा तपशील राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या संकेतस्थळावर सादर करणे गरजेचे आहे. तसेच विहित मुदतीत तपशील सादर न करणाºया व्यापाºयांचा नोंदणी दाखला रद्द करण्याची सुधारणाही या अधिनियमात करण्यास मान्यता देण्यात आली आहे.