पोस्टर्समधून उलगडल्या आरोग्यविषयक समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 06:28 AM2018-09-09T06:28:45+5:302018-09-09T06:28:46+5:30

बदलत्या जीवनशैलीमुळे आहारपद्धती आणि दैनंदिन आयुष्य बदलले आहे.

Health problems through posters | पोस्टर्समधून उलगडल्या आरोग्यविषयक समस्या

पोस्टर्समधून उलगडल्या आरोग्यविषयक समस्या

googlenewsNext

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे आहारपद्धती आणि दैनंदिन आयुष्य बदलले आहे. परिणामी, कामाचा ताण वाढत असून, स्पर्धात्मक युगामुळे आजारांचे प्रमाणही वाढत आहे. याचेच प्रतिबिंब १२व्या आशियाई वैद्यकीय परिषदेतील पोस्टर प्रदर्शनात दिसून आले. आरोग्यविषयक, पर्यावरण, प्रदूषणाच्या समस्यांवर आधारित विषय सादर करण्यात आले. नव्या पिढीत जागतिक पातळीवरील समस्यांविषयी जनजागृती करणे, हा या प्रदर्शनाचा मानस आहे.
१२व्या एशियन काँग्रेस आॅफ ओरल अ‍ॅण्ड मॅक्सिलोफेसियल रेडिओलॉजी आणि ५व्या इंटरनॅशनल ग्रीन हेल्थ कॉन्फरन्समध्ये शनिवारी, नेहरू विज्ञान केंद्रात हे पोस्टर्स प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन एशियन अ‍ॅकॅडमी आॅफ ओरल मॅक्सिफेसियल रेडिओलॉजीच्या अध्यक्षा डॉ. सुनाली खन्ना यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनातील पोस्टरच्या माध्यमातून आररोग्यविषयक विविध समस्यांचा आढाव घेण्यात आला. या प्रदर्शनानंतर परदेशांतील विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि डॉक्टरांनी जागतिक स्तरावरील विविध समस्यांचाही आढावा घेतला.
पर्यावरणाचे ढासळणारे संतुलन, जीवनशैलीमुळे बळावणारे आजार अशा मुख्य विषयांवर गेले तीन दिवस परिषदेअंतर्गत चर्चा सुरू आहे. या समस्या व प्रश्नांविषयी नवीन पिढीत जागृती व्हावी, या उद्देशाने या परिषदेत शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन तरुणाईलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यात आले आहे.
या परिषदेतील विविध विषयांवरील निष्कर्ष अहवाल संबंधित यंत्रणांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुनाली खन्ना यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Health problems through posters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.