शिवसेनेच्या शाखा झाल्या आरोग्य मंदिरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 05:09 PM2020-07-05T17:09:56+5:302020-07-05T17:10:22+5:30

मागाठाणेत शिवसेना शाखेतील दवाखान्यात ऑक्सिजन सेंटरची सुविधा

Health temples became branches of Shiv Sena | शिवसेनेच्या शाखा झाल्या आरोग्य मंदिरे

शिवसेनेच्या शाखा झाल्या आरोग्य मंदिरे

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई :  शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची प्रत्येक शाखा ही विभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी 'न्यायमंदिर' असले पाहिजे असे आदेश सर्व शिवसैनिकांना दिले होते.

मुंबईतील शिवसनेच्या 227 शाखांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाखा तिथे दवाखाने सुरू करा  आवाहन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
अलिकडेच शिवसैनिकांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली, दहिसर,मागाठाणे विभागातील शाखेत मोफत दवाखाने सुरू करुन शिवसेना शाखांना न्यामंदिरा बरोबरच आरोग्य मंदिरही बनविले आहे.रोज नागरिक मोठ्या संख्येने या सुविधेचा लाभ घेत असल्याचे चित्र आहे.

मागाठाणे विभागात उदेश पाटेकर व प्रभाग क्र ४ च्या नगरसेविका सुजाता पाटेकर,यांच्या पुढाकाराने रावळपाडा येथे, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी शाखा क्र ३ येथे, माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे व नगरसेविका रिद्धि खुरसंगे यांनी गणेश चौक,  काजूपाडा येथेशिवसेना शाखा क्र. १२  मध्ये शाखेतील दवाखान्याचा शुभारंभ केला आहे. या दवाखान्याचे वैशिष्ठ्य म्हणजे मुंबईत प्रथमच शिवसेना शाखेतील दवाखान्यामध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, मोफत औषधांबरोबर कोविड संशयित रुग्णाकरीता ऑक्सिजनची सुविधा देखिल सुरु करण्यात आली आहे कोरोना झालेल्या रुग्णांमध्येे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असते व रुग्णालयात बेडची व्यवस्था होई पर्यंत ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित न ठेवल्यास रुग्णाची अवस्था गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शिवसेना शाखांमध्ये डॉक्टरांसह परीचारिका तैनात करुन चार ऑक्सिजनच्या सुविधेसह बेडस् उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे विभागीतील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे  अशी माहिती आमदार विलास पोतनीस यांनी दिली.
 

Web Title: Health temples became branches of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.