Join us

आरोग्य कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून वेतन नाही

By admin | Published: June 23, 2015 11:28 PM

वाड्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र प्रशासन या

वाडा : वाड्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र प्रशासन या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या खात्याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरीकांत संताप आहे.पावसाळा सुरू झाला की आदिवासी दुर्गम भागात कुपोषणाचे तसेच बालमृत्यू, माता मृत्यू यांचे प्रमाण वाढते. या बरोबरच गॅस्ट्रो, मलेरीया, डेंग्यू, जुलाब, उलटी आदी साथीच्या रोगांचे प्रमाण अधिक असते. या काळात आरोग्य यंत्रणेचे या भागात अधिक लक्ष असणे गरजेचे आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना वेतन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे.या संदर्भात वाड्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता आॅनलाईन कार्यप्रणालीचे काम सुरू असल्यामुळे तीन महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले नाही असे सांगितले. तर आरोग्य अधिकारी हे कार्यालयात येतच नसल्याने त्यांना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची काय माहिती असेल, असा सवाल एका आरोग्य कर्मचाऱ्याने केला. (वार्ताहर)