मुंबई : मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या महत्त्वाच्या गरजा बनल्या आहेत. एकीकडे वाढते आजार आणि दुसरीकडे खर्चीक आरोग्य सेवा अशी सध्याची परिस्थिती आहे. पण सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य सेवेचे क्षेत्र हे व्यावसायिक न राहता, त्यामध्ये सेवेचा भाव असायला हवा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.शुश्रूषा सहकारी रुग्णालयाच्या विक्रोळी येथील सुमन रमेश तुलसियानी या १५० खाटांच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी राज्यपाल नाईक, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सहकार मंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आमदार प्रसाद लाड, सरदार तारासिंग, राम कदम, शुश्रूषा हॉस्पिटलचे अध्यक्ष सुभाष दांडेकर, कार्याध्यक्ष डॉ. नंदकिशोर लाड आदींची उपस्थिती होती.सहकारातून जनसामान्यांना आरोग्य सेवा देणाऱ्या शुश्रूषा हॉस्पिटलचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळीने अनेक क्षेत्रांत दबदबा निर्माण केला आहे. शुश्रूषाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातही त्याची प्रचिती मिळत आहे. डॉ. वसंत रणदिवे यांनी त्या काळी वैद्यकीय क्षेत्रासाठी सहकाराचा पर्याय वास्तवात आणला. सहकाराच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाºया या मंडळींचे कार्य अभिनंदनास्पद आहे, असे राज्यपाल नाईक म्हणाले.संस्थेचे अध्यक्ष दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी शुश्रूषाच्या ५० वर्षांच्या वाटचालीची गाथा मांडणाºया स्मरणिकेचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.>मॉड्युलर पद्धतीचीतीन शस्त्रक्रियागृहेपूर्व द्रुतगती मार्गाशेजारी साकारण्यात आलेल्या या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात १५० खाटा आहेत. सहा मजली इमारतीत २४ खाटांचे अतिदक्षता कक्ष, सहा खाटांचे एनआयसीयू, आपत्कालीन वैद्यकीय सुविधांसह मॉड्युलर पद्धतीची तीन शस्त्रक्रियागृहे अशा विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आहेत.
आरोग्य सेवेचे क्षेत्र व्यावसायिक नसावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:32 AM