आरे वृक्षतोडीप्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 09:01 PM2019-10-06T21:01:43+5:302019-10-06T21:06:23+5:30
लॉच्या काही विद्यार्थ्यांनी एका पत्राद्वारे सुप्रीम कोर्टाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.
मुंबई - भुयारी मेट्रो - तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीत वृक्षतोड सुरू झाली असून त्यास विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना रोखण्यासाठी पोलिसांना नाकाबंदी करावी लागली. तसेच त्याची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेत सुमोटो दाखल करून घेतला आहे. या सुमोटोवर उद्याच सुनावणी आहे. लॉच्या काही विद्यार्थ्यांनी एका पत्राद्वारे सुप्रीम कोर्टाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत सुप्रीम कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या पत्राचं जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आलं असून या याचिकेवर उद्या सोमवारी सकाळी १० वाजता सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठित करण्यात आलं असून त्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी होणार आहे. आरे हे जंगल नसल्याचं नमूद करत मुंबई हायकोर्टाने तेथील वृक्षतोडीस स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लगेचच शुक्रवारी रात्रीच्या अंधारात प्रशासनाने झाडांची कत्तल सुरू करण्यात आली. मेट्रो कारशेडसाठी सुमारे २ हजार ६०० झाडे तोडावी लागणार असून रात्रभरात किमान १ हजार झाडे इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने तोडण्यात आली. स्थानिक नागरिक, आदिवासी बांधव तसेच पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीला कडाडून विरोध केला. वृक्षतोडीची माहिती मिळताच हजारो नागरिक आरेवर धडकले. मात्र, वृक्षतोड थांबवण्यात आली नाही. उलटपक्षी पोलिसांनी त्या ठिकाणी जमावबंदी करून काहींना अटक केली.
मुंबई - आरेतील वृक्षतोडीवर सुप्रीम कोर्टात उद्याच सुनावणी https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) October 6, 2019
A delegation of students had written a letter to the Chief Justice of India earlier today, 'requesting SC to take cognizance in Mumbai's #Aarey matter, for stay in Tree-Axing undertaken by Municipal Corporation of Greater Mumbai with Mumbai Metro Rail Corporation & Mumbai Police' https://t.co/sHsL7st4Lm
— ANI (@ANI) October 6, 2019