Join us

सुनावणीला कोकण आयुक्तांचीच दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 6:06 AM

शिवसेनेतील प्रवेशाची महासभेत अधिकृत घोषणा झाल्यानंतरही मनसेच्या सहा नगरसेवकांवर अद्याप संकट घोंघावत आहे. मात्र, कोकण आयुक्तांनीच आज दांडी मारल्यामुळे या प्रकरणावर कोकण आयुक्तालयात सोमवारी सुनावणीच झालीच नाही.

मुंबई : शिवसेनेतील प्रवेशाची महासभेत अधिकृत घोषणा झाल्यानंतरही मनसेच्या सहा नगरसेवकांवर अद्याप संकट घोंघावत आहे. मात्र, कोकण आयुक्तांनीच आज दांडी मारल्यामुळे या प्रकरणावर कोकण आयुक्तालयात सोमवारी सुनावणीच झालीच नाही. यावर आता २१ मे रोजी सुनावणी होणार असल्याने, या नगरसेवकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.मनसेच्या सहा नगरसेवकांनी गेल्या वर्षी सेनेत प्रवेश केला होता. यामुळे पालिकेत शिवसेनेची ताकद वाढून भाजपा आणि मनसे या दोन्ही प्रतिस्पर्धींना धक्का बसला आहे. या मोबदल्यात मनसेतून आलेल्या नगरसेवकांना पालिकेत महत्त्वाची पदे दिली आहेत. मात्र, मनसेने कोकण आयुक्तालयात धाव घेतल्याने, या नगरसेवकांवरील संकट कायम आहे. या नगरसेवकांचे पद रद्द करण्याच्या मनसेच्या याचिकेवर सुनावणीसाठी कोकण आयुक्तांनी नगरसेवकांना उपस्थित राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र, कोकण आयुक्त जगदीश पाटील गैरहजर असल्याने सुनावणी न होता पुढील तारीख देण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढच्या सोमवारी २१ मे रोजी होणार आहे.

टॅग्स :मनसे