मुंबई : महावितरणने ३० हजार कोटींची महसूली तूट भरून काढण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. सरासरी १५ टक्के वीज दरवाढीचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर सुनावणी सुरू झाली आहे.नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नवी मुंबई येथे ही सुनावणी होणार आहे. ७ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता नागपूर येथील धरमपेठ, व्हीआयपी रोडवरील वानामाती हॉल, ९ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील काउन्सिल हॉल, ११ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांचे कार्यालयातील मीटिंग हॉल, १३ आॅगस्टला नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन आणि १६ आॅगस्टला नवी मुंबईतील नेरूळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे या सुनावणी होणार आहेत.
वीजदरवाढीवर सुनावणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 6:18 AM