मराठा आरक्षणावर मार्चमध्ये सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 08:26 AM2021-02-06T08:26:23+5:302021-02-06T08:26:50+5:30
मराठा आरक्षणांशी संबंधित याचिकांवर ८ मार्चपासून प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल अशा दोन्ही संमिश्र पद्धतीने सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
नवी दिल्ली : मराठा आरक्षणांशी संबंधित याचिकांवर ८ मार्चपासून प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल अशा दोन्ही संमिश्र पद्धतीने सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने शुक्रवारी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाल्यास संबंधित पक्षकार न्यायालयीन कक्षात प्रत्यक्षपणे युक्तिवाद करू शकतात आणि एखाद्या पक्षकाराला व्हर्च्युअलपणे युक्तिवाद करायचा असल्यास संबंधित पक्षकार अशा पद्धतीने युक्तिवाद करू शकतात.
कोविड-१९ च्या साथीमुळे गेल्या वर्षी मार्चपासून सर्वोच्च न्यायालय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत सुनावणी घेत आहे. प्रत्यक्षपणे सुनावणी
घेण्यास लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. घटनापीठात न्या. एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नजीर, हेमंत गुप्ता आणि एस. रवींद्र भट यांचाही समावेश आहे.